खामगाव : बहुचर्चित १४ प्लॉट बनावट मुद्रांक खरेदीचे खोटे शासकीय कागदपत्र बनविण्याचे प्रकरणात कोट्यावधी ने फसवणुकीचे आरोपी असलेला स्थानिक प्रेम हॉटेल चे संचालक प्रदीप राठीला आणखी एका फसवणुकीच्या गुन्ह्यात अटक करून पोलिस कोठडी घेतली आहे. याबात देशमुख प्लॉट भागातील रहिवासी श्रीमती रेखा भगीरथ अग्रवाल यांच्या नावाने खरेदी करून दिलेला प्लॉट नंबर ८९ हा प्रदीप राठी याने बेकायदेशीरपणे विभाजन करून तिघांना विकून २५ लाखाने फसवणूक केली आहे अशी तक्रार श्रीमती रेखा अग्रवाल यांनी शहर पोस्टला दिली होती.
या तक्रारीवरून शहर पोलिसांनी १६ मार्च रोजी प्रदीप राठी विरुद्ध ४२० नुसार गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणात बुलडाणा आर्थिक गुन्हे शाखेने प्रदीप रराठीला अटक करून त्याची २९ एप्रिल रोजी खामगाव न्यायालयात हजर करून पोलीस कोठडी मिळवली आहे. विशेष म्हणजे प्लॉट व बनावट मुद्रांक खरेदीचे खोटे शासकीय कागदपत्र बनवून कुठे कोटयवधीने फसवणूक केल्याप्रकरणी प्रदीप राठी न्यायालयीन कोठडीत आहे. खामगांव येथून आर्थिक गुन्हा शाखेने ताब्यात घेतले होते