November 20, 2025
जिल्हा बातम्या बुलडाणा महाराष्ट्र राजकीय

प्रजासत्ताक दिनी शहीद जवानांच्या कुटूंबीयांना मदतीचे धनादेशाचे वितरण

बुलडाणा : पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्याहस्ते आज 26 जानेवारी 2021 रोजी प्रजासत्ताक दिन कार्यक्रमात पोलीस कवायत मैदानावर विविध पुरस्कार, आर्थिक मदतीचे वितरण करण्यात आले. सशस्त्र सेना ध्वजदिन 2019 चे उत्कृष्ट निधी संकलनाबाबत जिल्हाधिकारी एस रामामूर्ती यांना स्मृतिचन्ह देण्यात आले. शहीद झालेल्या जवानांच्या कुटूंबियांना आर्थिक मदतीच्या धनादेशाचे वितरण यावेळी करण्यात आले. यामध्ये मलकापूर येथील शहीद जवान संजयसिंह राजपूत यांच्या आई वीरमाता श्रीमती जिजाबाई भिकमसिंह राजपूत, चोर पांग्रा ता. लोणार येथील शहीद जवान नितीन राठोड यांच्या वीरपत्नी श्रीमती वंदना राठोड व वीरमाता सौ. सावित्रीबाई राठोड यांना प्रत्येकी प्रति कुंटूंबीय 40 लक्ष रूपये निधीचे धनादेश प्रदान करण्यात आले. तसेच शहीद जवान अनिल वाघमारे यांच्या वीरपत्नी किरण अनिल वाघमारे यांना 45 लक्ष रूपयांचा धनादेश देण्यात आला. शहीद जवान चंद्राकांत भाकरे यांच्या वीरपत्नी मनिषा भाकरे, वीरमाता निर्मलाबाई भाकरे व वीरपीता भगवंतराव भाकरे यांना 40 लक्ष रूपयांचे धनादेश प्रदान करण्यात आले. जिल्हा पोलीस दलातर्फे नक्षलग्रस्त भागात खडतर व कठीण कर्तव्य बजाविल्याबाबत खामगांवचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. कोळी यांना विशेष सेवा पदक देण्यात आले. तसेच नैसर्गिक आपत्तीमध्ये जीव धोक्यात घालून उत्कृष्ट काम केल्याबद्दल आपत्ती निवारण अधिकारी संभाजी पवार, महसूल सहायक किसन जाधव, संजय खुळे, राजेंद्र झाडगे, पो. कॉ तारासिंग पवार, संतोष वनवे, दिपक वायाळ, रविंद्र गिते, संतोष काकड, होमगार्ड प्रविण साखरे यांना प्रशस्तीपत्र देण्यात आले. पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये गुणवत्ता यादीत आल्याबद्दल खामगांव येथील श्रीमती सरोजबेन दामजीभाई विकमसी ज्ञानपीठची विद्यार्थीनी कु. तनिष्का रितेश चौधरी यांचा गौरव करण्यात आला.कोविड काळात उत्कृष्ट काम केल्याबद्दल डॉ मोहम्मद अस्लम व त्यांच्या चमूला प्रशस्तीपत्राचे वितरण करण्यात आले. त्याचप्रमाणे महावितरणच्यावतीने सौर कृषी पंप मिळालेल्या शेतकऱ्यांना डिमांट नोट याप्रसंगी देण्यात आल्या.

Related posts

वर्दळीच्या मार्गावर महामंडळ बसचा ब्रेक फेल मोठा अपघात टाळला…

nirbhid swarajya

रागाच्या भरात दारुड्या पतीने केली पत्नीची हत्या

nirbhid swarajya

मराठा समाज सेवा मंडळ खामगाव नूतन कार्यकारिणी जाहीर

nirbhid swarajya
error: Content is protected !!