November 20, 2025
आरोग्य खामगाव गुन्हेगारी जिल्हा बुलडाणा

पोलीस स्टेशन समोर आत्महत्याचा प्रयत्न; गुन्हा दाखल

खामगांव : येथे पोलिस ठाण्याच्या आवारातच एका तरूणाने पेट्रोल अंगावर ओतून घेऊन आत्मदहन करण्याचा प्रयत्न केल्याची घटना काल सायंकाळी घडली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संध्याकाळी ७:३० च्या सुमारास आकाश धनंजय शेळके हा युवक पोलीस स्टेशन आवारात विना मास्क येऊन जोरजोराने आरडाओरड करत “माझ्यावरच पोलीस रेड का टाकता” मी इथेच आत्महत्या करतो.. असे बोलून आपल्या हातातील बॉटलमध्ये असलेले पेट्रोल अंगावर घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला.यावेळी पोलीस स्टेशन मध्ये ड्युटीवर असलेल्या कर्मचाऱ्यांना सदर बाब लक्षात येताच त्यांनी तात्काळ आकाश शेळके याला आत्महत्या करण्यापासून रोखले. त्यानंतर पोलिसांनी त्याला पोलीस स्टेशन मध्ये आणून बसवले त्यानंतर त्याची वैद्यकीय तपासणी करण्याकरीता येथील सामान्य रुग्णालयात पाठवण्यात आले. सामान्य रुग्णालयातील डॉक्टरांनी आकाश शेळकेची तपासणी करून दिलेल्या वैद्यकीय अहवालावरून नापोका मिरगे यांच्या फ़िर्यादिवरून आकाश धनजंय शेळके विरुद्ध आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी कलम ३०९,१८८, २६९, २७० भादवी तसेच ५१ ब आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ नुसार गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर करत आहे.

Related posts

राममंदिर भूमीपूजन दिवशीच राममंदीरात कारसेवकाचे निधन

nirbhid swarajya

केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव १८ सप्टेंबर पासून बुलढाणा लोकसभा मतदारसंघात!

nirbhid swarajya

बारावीत ७९% टक्के मिळवूनही विद्यार्थ्याची आत्महत्या

nirbhid swarajya
error: Content is protected !!