पोलीस कर्मचाऱ्याला मुख्यालयात जमा करून अंतर्गत चौकशीचे पोलीस अधीक्षकांचे आदेश
बुलडाणा : राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याशी फोनवर उर्मटपणे बोलणे मलकापूर जवळील एमआयडीसी पोलीस स्टेशन च्या पोलीस कर्मचाऱ्याला चांगलेच महागात पडले आहे. या कर्मचाऱ्याला पोलीस मुख्यालयात जमा करण्यात आले असून त्याच्या अंतर्गत चौकशीचे आदेशही बुलडाणा जिल्हा पोलीस अधिक्षक यांनी दिले आहेत. या घटनेमुळे पोलीस विभागात खळबळ उडालीये.
बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर च्या एमआयडीसी पोलीस स्टेशन मध्ये कार्यरत असलेले पोहेकॉ रवींद्र पोळ हे २८ मार्च ला राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर आंतरजिल्हा सीमावर्ती चेकपोस्ट वर कार्यरत होते , त्यावेळी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांचे खाजगी सचिव वैभव तुमाने हे नागपूर वरून मुंबईला ला गाडीने जात असताना पोलीस कर्मचारी रवींद्र पोळ यांनी त्यांच्याशी अरेरावी करून असौजन्यपुर्वक गैरवतर्न केलेय शिवाय पोलीस कर्मचारी रवींद्र पोळ हे तेवढ्यावर न थांबता त्यांनी रात्री दीड वाजता गृहमंत्र्यांना फोन लावायला सांगितले आणि स्पीकर चालू करून गृहमंत्र्यांना आदर न करता त्यांच्याशीही उर्मटपणे संवाद केला त्यामुळे शिस्तबद्ध पोलीस खात्यात अशोभनीय गैरवर्तन, बेशिस्त आणि बेजबाबदार पने वागणाऱ्या या पोलीस कर्मचाऱ्यास तातडीने पोलीस मुख्यालयात जमा करण्यात आले. तसेच त्याची चौकशी करण्याचे आदेश हि बुलडाणा जिल्हा पोलीस अधिक्षक यांनी दिले असून त्याच्यावर काय कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.