बुलढाणा: बुलढाण्याचे पोलीस अधीक्षक सारंग( आयपीएस) आव्हाड यांची पदोन्नतीवर बदली झाली आहे. त्यांच्या अगोदर अधीक्षक असलेले अरविंद चावरीया यांची देखील पदोन्नती झाली आहे.त्यांची पुणे येथे पोलीस उप महानिरीक्षक(गुन्हे अन्वेषण विभाग) या पदावर पदोन्नतीवर बदली झाली आहे. नागपूर येथून बदलून आलेले सारंग आव्हाड यांनी काही महिन्यापूर्वीच बुलढाण्याचे पोलीस अधीक्षक पदाची सूत्रे सांभाळली होती. त्यांची पदोन्नती जवळपास ठरलेली होती. त्यांची येथील कामगिरी संमिश्र स्वरूपाची राहिली. काही गंभीर घटना घडल्या असल्या तरी त्यावर तात्काळ नियंत्रण करण्यात त्यांची हातोटी दिसून आली. गुन्हे कमी कालावधीत उघडकीस आणण्यावर त्यांनी यशस्वीपणे भर दिला. त्यांच्या पूर्वी बुलढाण्याचे पोलीस अधीक्षक असलेले अरविंद चावरिया यांचीही पदोन्नती झाली आहे. सध्या पुणे येथे गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस अधीक्षक असलेले चावरीया यांना पुणे येथेच अपर पोलीस आयुक्त( प्रशासन) या पदावर पद स्थापना देण्यात आली आहे.
next post