खामगाव: वसुलीच्या माध्यमातून पोलीसांची प्रतिमा मलिन करणाऱ्यां मस्तवाल मनोजला अखेर जिल्हा पोलिस अधिक्षकांनी खुंट्यावर बांधले आहे. शेगाव शहर पोलिस स्टेशनसोबतच शिवाजी नगर पोलीस स्टेशनमध्येही मनोजच्या मस्तवाल पणाची प्रकरणं चांगलीच गाजली होती. नुकत्याच एका प्रकरणात मनोजने पोलीस निरिक्षकांच्या माघारी एका प्रकरणात सेटींग केली. तसेच रेतीच्या प्रकरणात धमकावले. त्यामुळे संबंधिताला पोलीस प्रशासनाने नोटीसही बजावली. मात्र, तरीही त्याच्या वर्तणुकीत सुधारणा झाली नाही.गंभीर स्वरूपाच्या तक्रारी तसेच पोलीस प्रशासनाची प्रतिमा मलिन करण्याचा आरोप असलेल्या एएसआय मनोज खुंटे यांना हेड क्वार्टर अॅटच करण्यात आले. या संदर्भातील आदेश जिल्हा पोलीस अधिक्षकांनी सोमवारी काढला. त्यामुळे पोलीस विभागात एकच खळबळ उडाली आहे.या आधी निर्भिड स्वराज्य ने मस्तवाल्याचे सर्व प्रकरण बाहेर आणले होते हे विशेष…..