खामगाव : जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात रेती तस्करी सुरू आहे. संचारबंदीच्या काळातही विनापास परवाना अवैधरित्या रेती तस्करी करतांना 3 रेतीच्या अवैध गाड्या पकडण्यात आल्या.
जलंब खामगांव मार्गावरुन अवैध रेतीची वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती शहर पोलिसांच्या डी बी पथकाला मिळाली होती या महितीच्या आधारे पोलिसांनी शोध घेतला असता 3 रेतीच्या गाड्या जलंब रोडने खामगांव कडे येत असताना दिसून आल्या. यावेळी गाडीची पाहणी केली असता MH 28 AB 4714 चालक शे सलमान शे हाशम रा माटरगांव यांच्या गाडीत 1 ब्रास यासह MH 28 2761 चालक संतोष गोराळे यांच्या गाडीत 2 ब्रास रेती दिसून आली. यावेळी त्यांना रॉयल्टी मागितली असता सदर पावतीवर खोडातोड़ दिसून आली.
तर MH 28 AB 8215 ही खाली गाड़ी सह तिन्ही गाड्या शहर पोलिस स्टेशन ला लावण्यात आल्या आहेत व पुढील कारवाई साठी ह्या गाड्या तहसील विभागाच्या ताब्यात देण्यात आल्या असून ही कारवाई शहर पोलिस स्टेशन चे सहाय्यक पोलिस निरीक्षक लांडे, नापोका संदीप टकसाळ, नापोका सूरज राठोड़, पोका दीपक राठोड़ यांनी केली आहे.