१ लाख ५० हजार रूपयांचा माल जप्त
खामगाव : येथील किसन नगर भागात सार्वजनिक ठिकाणी पैशाच्या हारजीत वर वरली मटका नावाचा खेळत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे शिवाजी नगर पोलिसांनी छापा मारून जवळपास १ लाख ५० हजाराचा मुद्देमाल जप्त केला. खामगाव घाटपुरी रोडवरील किसन नगरमध्ये काल सायंकाळी ७.१० वाजताच्या सुमारास शिवाजी नगर पोलिसांनी छापा मारला असता मिलिंद विजय वास्कर, दिपक हर्षद कमानी, भगवान अर्जुन मिरगे, मनेश देविदास खोडके, चेतन गजानन चोपडे, अश्वीन विजय वास्कर, गणेश सुधाकर काटे सर्व रा. खामगाव हे लोकांकडून पैसे घेवून वरली मटका नावाचा जुगार खेळताना व खेळविताना मिळून आले.त्यांच्याजवळून जुगार साहित्य, नगदी ४ हजार १०० रू, मोटारसायकल १ लाख ४० हजार, मोबाईल १ हजार ५०० रू., व ताशपत्ते २० रू. असा एकूण १ लाख ४५ हजार ७२० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.याप्रकरणी पोलिस उपनिरिक्षक राहुल डिगांबर चव्हाण यांनी शिवाजी नगर पोलिस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरून उपरोक्त आरोपींविरूध्द कलम १२ अ मजुका अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच जिल्हाधिकारी बुलडाणा यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्यामुळे कलम १८८, २६९,२७०, २७१ भादंवि सहकलम ५१ ब राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापक कायदा सहकलम २,३,४ साथीचे रोग अधि.१८९७ अन्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास नापोकाँ देवेंद्र शेळके करीत आहेत.