खामगांव : येथील शिवाजी वेस मध्ये एका बंद घरात एक्का बादशाह नावाचा जुगार काहीजण पैशाच्या हार-जीत वर खेळत असल्याची गुप्त माहिती शिवाजीनगर पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी छापा मारला असता जवळपास १७ हजाराच्या मुद्देमालासह ८ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार शिवाजी वेस भागात राहणाऱ्या जितेंद्र पुरोहीत यांच्या घरी एक्का बादशहा नावाचा जुगार काहीजण खेळत असल्याची गुप्त माहिती शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या डीबी पथकाचे देवेंद्र शेळके यांना मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे पथकाने जितेंद्र पुरोहित यांच्या घरी छापा टाकला असता जितेंद्र पुरुषोत्तम पुरोहित सह पंकज महादेव नेमाने वय २५ वर्ष रा.पुरवार गल्ली, निलेश शंकराव उगले वय ४० वर्ष रा.शिवाजी वेस, आशिष राजेद्र राठी वय ३३ वर्ष शिवाजी वेस, आतीश अशोक श्रीनाथ वय २७ वर्ष रा.भोईपुरा शिवाजी वेश, प्रकाश श्रीराम जवजाळ वय ४८ वर्ष रा. नवाफैल, गोपाल शाम टाले वय २८ वर्ष रा.शिवाजी वेस, रोहित आंबादास भारसाकळे वय २२ रा.शिवाजी वेस हे २२ मे रोजी रात्री १२:३० वाजता च्या सुमारासएक्का बादशाह नावाचा जुगार खेळताना मिळून आले. त्यांची झडती घेतली असता त्यांचेजवळ तीन मोबाईल, ताश पत्ता व नगदी ४ हजार ४० रु असा एकूण १७ हजार ११० रुपयाचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला असून ८ जणांना ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी नापोका देवेंद्र शेळके यांनी शिवाजीनगर पोलीस स्टेशन मध्ये दिलेल्या फिर्यादीवरून उपरोक्त ८ आरोपींविरुद्ध मजुका कलम ४,५ सह कलम १८८,२६९,२७०.भा.द.वी सह.क.५१ ब राष्ट्रीय आपती व्यवस्थापन कायदा २,३,४ साथ रोग अधिनियम नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
previous post