मेहकर : शुल्लक कारणावरून पत्नीने आपल्या आठ महिन्यांची चिमुकलीला विहिरीत फेकून देऊन मारल्याची दुर्देवी घटना जाणेफळ रोडवरील घरकुल येथे घडली.
नगर परिषद च्या वतीने जानेफळ रस्त्यावर बांधण्यात आलेल्या घरकुल येथे राहणाऱ्या सलीम चौधरी गवळी व त्याची पत्नी जरीना सलीम चौधरी या दोघांमध्ये नेहमी वाद व्हायचे आजही दोघांचे शुल्लक कारणावरुन वाद झाले व रागाच्या भरात पत्नी जरीना यांनी आज सायंकाळी चारच्या सुमारास आपल्या आठ महिन्याच्या चिमुकलीला काही अंतरावर असलेल्या विहिरीत फेकून दिले. या घटनेमुळे घरकुल मध्ये राहणाऱ्या सर्व लोकांत एकच खळबळ माजली असून विहिरीवर चिमुकलीला लोकांनी पाहण्यासाठी एकच गर्दी केली होती. त्यावेळी विहिरित जास्त पाणी असल्याने बाहेर काढता आले नाही पोलीसांना घटनेची माहिती मिळताच ते घटनास्थळी उपस्थित झाले.
previous post