October 6, 2025
आरोग्य जिल्हा बुलडाणा महाराष्ट्र मुंबई

पॉलिक्लिनिक बंद करण्याला अधिकाऱ्यांना मिळाले कारण…

माजी सौनिकांसाठी असलेले पॉलिक्लिनिक 14 दिवस बंद…

पॉलिक्लिनिक मधील चार कर्मचारी निघाले पॉझिटिव्ह…

बुलडाणा : जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्ण वाढत आहेत त्यामुळे सुरक्षित राहून आता कोरोनसोबत लढायचे आहे हे निश्चित झाले आहे , त्यामुळे ज्या कार्यालयात कोरोना रुग्ण निघाले तिथे पन्नास टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थिती मध्ये कार्यालये सुरू आहेत कारण नागरिकांना नाहक त्रास होऊ नये हा मानस प्रशासनाचा आहे मात्र माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबासाठी असलेल्या पॉलिक्लिनिक मध्ये आज कोरोनाचे चार रुग्ण आढळल्याने चक्क क्लिनिक च्या अधिकाऱ्यांनी चौदा दिवस क्लिनिक बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे, त्यामुळे या अधिकाऱ्यांना निमित्तास कारण मिळाले आहे अश्या चर्चा सुरू आहेत.माजी सैनिक व त्यांच्या कुटूंबियांसाठी बुलडाणा येथे पॉलीक्लिनिक आहे आणि या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी व अन्य पॅरा मेडिकल कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. या पॉली क्लिनिकमधील 4 कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने 16 मार्चपासून पुढील 14 दिवसांकरिता हे रुग्णालय बंद ठेवण्यात आले आहे. 4 कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह निघणे ही दुर्दैवी व धक्कादायक बाब असली तरी हे रुग्णालय तब्बल 14 दिवसंकरिता बंद ठेवण्यात आल्याने शेकडो माजी सैनिक व त्यांच्या कुटूंबातील सदस्यांची प्रचंड गैरसोय होणार आहे. त्यांच्‍यावर खाजगी रुग्णालयात महागडे उपचार घेण्याची पाळी आली आहे. कर्मचारी पॉझिटिव्ह निघाल्यावर सर्व दक्षता, सॅनिटाईज केल्यावर हे रुग्णालय मोजक्या कर्मचाऱ्यांच्या हजेरीत सुरू करणे आवश्यक व अपेक्षित होते. कारण बुलडाणा तहसील कार्यलयामधील तब्बल 21 कर्मचारी पॉझिटिव्ह आल्यावरही नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी तहसील कार्यालय पूर्ववत सुरू ठेवण्यात आले आहे. यामुळे आरोग्य सेवा विषयक ही पॉलिक्लिनिक बंद ठेवणे कितपत रास्त आहे असा सवाल उपस्थित झाला आहे. यामुळे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती , जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी तातडीने पर्यायी व्यवस्था करून हे पॉली क्लिनिक तात्काळ सुरू करण्याची मागणी होत आहे. लोकप्रतिनिधिनी सुद्धा याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

Related posts

मै सबके लिये दुवा करुंगी..

nirbhid swarajya

आषाढी एकादशी निमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन…

nirbhid swarajya

शेगाव येथून संग्रामपूर कडे जाणाऱ्या एसटी बसला कारची धडक

nirbhid swarajya
error: Content is protected !!