आत्महत्येपूर्वी मोबाईल मध्ये केले व्हिडिओ रेकॉर्डिंग
खामगाव : पैशाच्या व्यवहारातुन जनुना येथील एका युवकाने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली
जनुना येथील मीरा नगरातील रहिवासी शुभम राजू गावंडे (२५) या युवकाची बायपास वरील बियाणे महामंडळा समोर चहा नाश्त्याची हॉटेल असुन त्याने हॉटेलमधील छताच्या अँगलला गळफास लावून आत्महत्या केली सदर घटना आज ११ जुलै २०२३ रोजी सकाळी उघडकीस आली या प्रकरणी मृतकाचा भाऊ सागर गावंडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिवाजीनगर पोलिसांनी मर्ग दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार शुभम गावंडे यानी आत्महत्या करण्यापूर्वी स्वतःच्या मोबाईल मध्ये रेकॉर्डिंग करून आत्महत्येचे कारण सांगितले असून पैशाच्या व्यवहारातून ही घटना घडली;तर यामध्ये दोघांची नावे घेण्यात आली असल्याचे समजते पोलिसांनी मोबाईल जप्त केला असून पुढील तपास ठाणेदार अरुण परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली एएसआय रहमान चौधरी,पोहेका विजय उभे व पोका प्रदीप वानखडे करीत आहेत.