पवित्र रमज़ान महिन्यात मुसलमान ईद साजरी करणार आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलासोबत
बुलडाणा: राज्यातील मुस्लिम बांधवाच्या वतीने यंदा पवित्र रमजान महिन्याच्या पार्श्वभूमीवर पैगंबर सर्वासाठी हे अभिनव अभियान राबवन्यात येणार आहे.समाज बांधवकडून अनाथ बालके व गरजु कुटुंबयासमवेत ईद साजरी केली जाणार आहे अशी बातमी मोहसिन शेख अभियानचे जिल्हा सदस्य यांनी दिली.रमजान हा समस्त मानव सेवेसाठी समर्पित समाज निर्माण करण्यासाठीचा प्रशिक्षणाचा महीना आहे.रोजा हा वाईट गोष्टीचा त्याग,सत्कर्म, परोपकार,नैतिकता, करुणा,दयाशीलता,व गरजु शोषित अनाथ बालके व विधवाना मदत करण्याची प्रेरणा देतो,इस्लाम हा केवळ मुस्लिमाचा धर्म आहे हा गैरसमज असून इस्लाम ही मानव जातीची जीवन पद्धति आहे
हज़रत मुहम्मद पैंगंबार याचा संदेश प्रत्यक्ष कृतितुन समाजापुढे आणण्यासाठी हे अभियान हाती घेण्यात आलेले आहे.गरजु व आत्महत्याग्रस्त शेतकरी मुलाना बुलडाणा जिल्ह्यात 100 पेक्षा जास्त मुला सोबत ईद साजरी केली जाणार आहे व त्यांना कपड़े व शिरखुरमाची मेजवानी करण्यात येणार आहे.आमच्या जवळ 40 पेक्षा जास्त मुलाना कपड़े जमा झालेले आहे जर आपण गरजु व गरीब मुलांच्या चेहऱ्यावर हसू पहायचे आहे तर आपली साथ मोलाची राहिल अभियान मध्ये,असीम शेख,आबिद सर,रियाज़ भाई,वसीम अली सर,शरीफ भैया रफ़ीक सौदागार,सद्दाम हुसेन,आलिम शाह,महमुद शेख,यूसुफ सर,आबिद कुरेशी इमरान खान आदी चा सहभाग आहे अशी माहिती मोहसिन शेख यांनी दिली आहे