खामगाव : पुरोगामी महाराष्ट्र कामगार संघटना नागपूर कडून बुलडाणा जिल्हाध्यक्षपदी सचिन रमेश ठाकरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पुरोगामी महाराष्ट्र कामगार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सुधीर सुर्वे तसेच महासचिव भूमेश्वर डोहाळे यांनी सचिन ठाकरे यांना नियुक्ती पत्र देऊन शुभेच्छा दिल्या तसेच समाजातील कामगारांसाठी असलेली तळमळ, कामाची शैली, धडपड, कामगारांच्या विकासासाठी असलेले उल्लेखनीय कार्य पाहून त्यांची निवड बुलडाणा जिल्हा अध्यक्षपदी करण्यात आली आहे कामगार संघटनेची मोठी जबाबदारी त्यांच्यावर देण्यात आली असून संघटनेकडून दिलेल्या पदाला पूर्ण न्याय देतील अशी अपेक्षा पुरोगामी महाराष्ट्र कामगार संघटना नागपुरच्या वतीने करण्यात आली आहे.
previous post
next post