खामगाव : कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे जिल्ह्यातील रुग्ण संख्येतही वाढ होऊ लागली आहे. स्थानिक पुरवार गल्लीत गेल्या पाच दिवसांपूर्वी निघालेल्या कोरोना रुग्ण तरुणाची पत्नीही काल कोरोना पॉझिटीव्ह निघाली आहे. तर या रुग्णाच्या संपर्कातील तब्बल १७ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. आतापर्यंत खामगाव शहरात ४ व्यक्ती पॉझिटीव्ह आले असून त्यापैकी एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
गेल्या १ जून रोजी स्थानिक पुरवार गल्लीतील तरुणाचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला होता. त्यामुळे सदर तरुणाला येथील कोविड रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आले तर त्याच्या संपर्कातील व्यक्तींना क्वारंटाइन करण्यात आले होते. त्यापैकी त्याच्या पत्नीचा कोरोना अहवाल काल पॉझिटीव्ह आला आहे. त्यामुळे पुरवार गल्लीची चिंता वाढून या भागातील नियम अधिक कडक करण्यात आले आहेत.