January 4, 2025
खामगाव गुन्हेगारी जिल्हा बुलडाणा महाराष्ट्र मुंबई राजकीय

पुढील आदेश येईपर्यंत अवैध धंदे बंद…..

बुलडाणा : खामगांव तालुक्यात दोन ते तीन दिवसांपासून अवैध धंदे करणाऱ्यांमध्ये खळबळ निर्माण झाली आहे. काही कर्मचाऱ्यांनी अवैध धंदे करणाऱ्यांना पुढील आदेश येईपर्यंत अवैध धंदे बंद करण्याचा सांगितले आहे. याचे कारण असे की एका निनावी व्यक्तीने वरिष्ठांकडे अधिकारी यांच्या कडे अवैध धंद्यात बाबत दिलेल्या तक्रारी मध्ये धंदे चालवणाऱ्यांची नाव, लोकेशन व त्यांच्याकडून हफ्ते घेणाऱ्या कर्मचाऱ्यांची नाव व रकमेसह टाकल्याने पोलीस विभागात व अवैध धंदे करणाऱ्यांमध्ये एकच खळबळ निर्माण झाली आहे. मिळालेल्या सूत्रांच्या माहितीनुसार जिल्ह्यासह खामगांव तालुक्यात अवैध मद्यविक्री, मटका, जुगार अड्डे, गुटखा विक्री, क्रिकेट सट्टे, यांसह मोठ्या प्रमाणात अवैध धंदे सुरू आहेत. पोलिस ठाण्यांचे अधिकारी आणि कर्मचारी यांच्या आशीर्वादाने सर्व अवैध धंदे सुरू असल्याची खमंग चर्चा जिल्ह्यातील नागरीकांमधे सुरु आहे. त्यामुळे या अवैध धंद्यांवरील कारवाई केवळ वरिष्ठांना कागदोपत्री दाखविण्यासाठी करण्याचा प्रकार केला जातो अशी चर्चा लोकांमधे खाजगीत करताना दिसून येत आहे.

यामुळे अवैध धंदे चालविणाऱ्यांचे त्या-त्या परिसरामध्ये वर्चस्व निर्माण झाले आहे. याबाबत स्थानिक नागरिकांनी तक्रार केल्यास त्यांनाही त्रास दिला जात होता, तर सामाजिक कार्यकर्त्यांनी याबाबत तक्रार केल्यास त्यांच्या तक्रारीलाही काही अधिकाऱ्यांकडून केराची टोपली दाखविली जात असल्याची माहिती एका सामाजिक कार्यकर्ता याने दिली आहे. शहरात अनेक ठिकाणी मटका, पत्त्यांच्या नावाखाली जुगाराचे अड्डे चालू आहेत. सध्या शहरातील अवैध धंदे आणि त्यांचे चालक भूमिगत झाले आहेत. काही ठिकाणी छुप्या पद्धतीने अवैध धंदे सुरू आहेत. लॉटरीच्या नावाखाली मटका खेळला जात आहे. शहराच्या मध्यवस्तीतील अनेक ठिकाणी अवैध धंदे जोमात सुरु आहेत. ह्या अवैध धंदा करणाऱ्या विरोधात एका निनावी व्यक्तिने काही दिवसांपूर्वी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या कडे अवैध धंदे करणाऱ्याच्या नाव व लोकेशन सहित तसेच कुठल्या पोलीस स्टेशन मधून कुठला कर्मचारी किती हप्ते घेतो याचीसुद्धा सविस्तर माहिती नावासहित व रकमेसह तक्रारीमध्ये दिलेली आहे. त्यामुळे अवैध धंदे करणाऱ्याचे धाबे चांगलेच दनाणले आहेत. व पोलीस विभागात सुद्धा खळबळ माजली आहे. त्या निनावी तक्रारिमुळे तत्कालीन गृहमंत्री यांनी अमरावती आयुक्त यांना कारवाई करण्याचे आदेश दिले होते.

त्यानंतर पोलीस आयुक्त यांनी बुलडाणा जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया यांना तात्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशानंतर जिल्ह्यातील सर्वच अवैध धंदे पुढील आदेश येईपर्यंत बंद करण्यात आले आहेत. या सर्व प्रकारणाची दखल घेत उद्या अमरावती पोलीस आयुक्त हे खामगांव शहरात येणार असल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे त्या निनावी पत्र पाठवणा-याने पत्रा मधे शेवटी असे सुद्धा लिहिले आले आहे की, या सर्व अवैध धंद्याचे फोटो, व्हिडीओ क्लीप्स, पुरावा म्हणुन आमच्याकडे उपलब्ध आहेत. जर हे अवैध धंदे बंद झाले नाही तर ते फोटो व व्हिडीओ क्लीप्स घेऊन सर्व संबंधीत वरिष्ठांकडे दाद मागावी लागेल असे नमुद केले आहे. या निनावी पत्रामध्ये दिलेल्या अवैध धंदे करणारे व हफ्तेखोर कर्मचाऱ्यांवर वरिष्ठ अधिकारी कोणती कारवाई करतात अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे

Related posts

गोडाऊन मधून 20 क्विंटल मूग लंपास

nirbhid swarajya

उपविभागीय अधिकारी कार्यालयातील कॅम्प सुरु करण्याची वकील संघाची मागणी

nirbhid swarajya

बुलडाणा शहरात आठवड्यातून फक्त दोन दिवसच मिळेल भाजीपाला

nirbhid swarajya
error: Content is protected !!