November 20, 2025
आरोग्य खामगाव जिल्हा बुलडाणा महाराष्ट्र मुंबई राजकीय विदर्भ शेतकरी

पीक विमा संदर्भात कृषी सचिवांची बुलडाण्यात तातडीची बैठक

भाजपच्या आंदोलनाचा धसका

खामगाव: भाजपच्या आंदोलनाचा धसका घेत पीक विमा संदर्भात राज्य सरकारने बुलडाणा जिल्यातील शेतकऱ्यांसाठी कृषी सचिवांनी तत् उपस्थितीत तातडीची बैठक नियोजित केली आहे. बुलडाणा जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना सन २०२० ते २१ ह्या वर्षातील अस्मानी व सुलतानी संकटे आलीत. अश्या वेळेस विमा कंपनीने मोजक्याच शेतकऱ्यांना लाभ लिळून दिला. हजारो शेतकरी पीकविमा पासुन अजूनही वंचित आहेत. शेतकऱ्यांच्या या प्रश्नावर भाजप जिल्हाध्यक्ष तथा आमदार अँड आकाश फुंडकर यांचे मार्गदर्शनाखाली भाजप किसान आघाडी जिल्हाध्यक्ष गजाननराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाभर आंदोलन करण्यात आले. भाजप किसान आघाडी यांच्या समवेत या आंदोलनात राज्य सरकार विरोधात जिल्ह्यात हजारो शेतकरी सहभागी झाले होते.

भाजपा जिल्हाध्यक्ष तथा आमदार अँड आकाश फुंडकर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनाची दखल राज्य सरकाने घेतली आहे , राज्याचे कृषी सचिव एकनाथ डवले यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवार दिनांक २२ जून रोजी तातडीची बैठक बोलावली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा पीक विमा व इतर प्रश्न सुटणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न सुटले नाहीत तर जिल्हाभर आणखी तीव्र आंदोलन करू असा इशारा भाजप जिल्हाध्यक्ष तथा आमदार अँड आकाश फुंडकर यांनी दिला आहे.

Related posts

जिल्ह्यात 94 कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’; तर 7 पॉझिटिव्ह

nirbhid swarajya

लॉकडाऊनला न जुमानता जनतेने सामान्य जिवनास प्रारंभ करावा – प्रदेशाध्यक्ष अशोक सोनोने

nirbhid swarajya

वंचितचे प्रदेशाध्यक्ष अशोक सोनोने यांचा वाढदिवस साजरा

nirbhid swarajya
error: Content is protected !!