January 1, 2025
आरोग्य पुणे महाराष्ट्र मुंबई राजकीय सामाजिक

पिंपरी चिंचवड शहर काँग्रेस पर्यावरण सेलच्या वतीने विविध सामाजिक उपक्रमाचे आयोजन

पिंपरी:जागतिक पर्यावरण दिनाचे निमित्त पिंपरी चिंचवड शहर काँग्रेस पर्यावरण सेलच्या वतीने जाधववाडी, दिघी काळभोर नगर, चिंचवड एमआयडीसी, केळगाव आळंदी येथे विविध सामाजिक उपक्रम व वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते अशी माहिती कार्यक्रमाचे आयोजक व पिंपरी चिंचवड शहर काँग्रेस पर्यावरण सेलचे अध्यक्ष अक्षय शहरकर यांनी प्रसिद्धीस दिली आहे.पर्यावरण दिनानिमित्त जाधववाडी येथील तलाव लगत आणि काळभोर नगर चिंचवड येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस सचिन साठे यांच्या हस्ते देशी वृक्ष लागवड करण्यात आले. तसेच आळंदी केळगाव येथील आपुलकी वृद्धाश्रमात ज्येष्ठ नागरिकांना फळवाटप करण्यात आले. दिघी येथील स्नेहछाया या लहान मुलांच्या अनाथाश्रमात शालेय साहित्य व खाऊचे वाटप करण्यात आले. मदर टेरेसा होम चिंचवड एमआयडीसी येथे ज्येष्ठ नागरिकांसाठी फळ वाटप करण्यात आले. त्याच बरोबर ‘देशाचा पोशिंदा बळीराजा सुखी राहू दे आणि यावर्षी देशभर मुबलक पर्जन्यवृष्टी होऊ दे’ अशी मागणी करीत पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती येथे अभिषेक करण्यात आला आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नानासाहेब पटोले यांना दीर्घायुष्य लाभो अशी प्रार्थना करण्यात आली. कार्यक्रमांमध्ये प्रदेश कॉंग्रेसचे सरचिटणीस सचिन साठे, ज्येष्ठ कामगार नेते विष्णुपंत नेवाळे, माजी नगरसेवक तुकाराम भोंडवे,तसेच पर्यावरण महाराष्ट्र विभाग सरचिटणीस अमर नाणेकर, सचिव अशोक काळभोर, शहर अध्यक्ष अक्षय शहरकर त्याचबरोबर दिलीप पांढरकर, संदेश नवले, इंद्रजीत गोरे देवानंद ढगे, प्रमोद पंडित, सिद्धांत रिकीबे, जीवन साखरे, मीना गायकवाड, प्रकाश पवार, देहू रोड रेल्वे स्टेशन अधिकारी रतन रजत तसेच कुंदन कसबे, विशाल कसबे, महालिंग स्वामी , डॉ. ओंकार मुळगावकर, आकाश भालेराव, जय सोनवणे, गुरू वागढरे, अशोक पाटील,धीरज खेरे, गोपाल कोरडे, महेश सातपुते आदी उपस्थित होते

Related posts

आदिवासी संग्रामपुर तालुक्यात आरोग्य यंत्रणा ठप्प , वैद्यकीय अधिकाऱ्यांचे “वर्क एट होम”.

nirbhid swarajya

जिल्ह्यात 94 कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’; तर 7 पॉझिटिव्ह

nirbhid swarajya

जिल्ह्यात आज प्राप्त 335 कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’; तर 72 पॉझिटिव्ह

nirbhid swarajya
error: Content is protected !!