October 6, 2025
खामगाव

पिंप्री गवळी येथे ८०० कुटुंबांना होमिओपॅथिक औषधी वाटप

ग्रामपंचायतचा अभिनव उपक्रम

खामगांव : बुलडाणा जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना रुगनांची संख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर कोरोनाला रोखण्यासाठी आणि सर्वसामान्यांची रोगप्रतिकारक शक्ति वाढवून कोरोना वर मात करण्यासाठी खामगांव तालुक्यातील पिंप्री गवळी येथे डॉ. प्रवीण  गासे यांच्या सहकार्यातून होमिओपेथीक औषधिचे वाटप करण्यात आले आहे.
कोविड १९ या रोगापासून बचाव करण्यासाठी अद्याप कोणतीही लस किंवा औषध तयार करण्यात आलेले नाही. हा रोग होऊ नये यासाठी सध्यातरी प्रतिकार शक्ती वाढवणे एवढा एकच मार्ग शिल्लक आहे यासाठी फॉस्टर डेव्हलपमेंट मेडिकल कॉलेजच्या वतीने अर्सनिक अल्बम १९ ही रोगप्रतिबंधक होमिओपॅथी औषध तयार करण्यात आली आहे. केंद्रीय आयुष मंत्रालयाने या औषधाला मान्यता दिलेली आहे. याच अनुषंगाने, पिंप्री गवळी येथील ग्रामपंचायत व गावातील नागरिकांच्या सहभागातुन ८०० कुटुंबांना या अर्सनिक अल्बम १९ या होमिओपेथीक औषधिचे वाटप करण्यात आले आहे.यासह गावात अनेक कोरोना प्रतिबंधक उपायोजना राबवण्यात आल्या आहेत. बुलडाणा जिल्ह्यातील पिंप्री गवळी ही रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी नागरिकांना होमिओपॅथिक गोळ्या वाटप करणारी ही पहिली ग्रामपंचायत ठरली आहे.


Related posts

खामगाव शेगाव पंचायत समिती कर्मचारी सहकारी पतसंस्थेची निवडणूक 11 डिसेंबरला.

nirbhid swarajya

शिवसेना व शिंदे गटात तुफान राडा ! बाजार समितीतील सेनेच्या कार्यक्रमात शिंदे समर्थकांचा हैदोस !!

nirbhid swarajya

खामगाव फार्मर्स,ट्रेडर्स आणि इंडस्ट्रियलिस्ट मार्फत खाद्यान्ना वरील जीएसटी ला विरोध

nirbhid swarajya
error: Content is protected !!