January 4, 2025
आरोग्य बुलडाणा

पालकमंत्र्यांनी स्वतः बाजारात जाऊन केली जनजागृती

बुलडाणा : संपूर्ण देशामध्ये कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला असून जिल्ह्यातही या कोरोनाचे ९ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहे, तर यातील एकाच अगोदरच मृत्यू झाला आहे. या कोरोनाला थांबवायचं असेल तर सोशल डिस्टसिंग या एक पर्याय आहे. म्हणूनच आज राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ राजेंद्रजी शिंगणे यांनी स्वतः चिंचोले चौकातील भाजी मार्केटला, मेडिकल स्टोअर्सला व रिलायन्स मार्टला प्रत्यक्ष भेट देऊन जनतेने सोशल डिस्टसिंग पाळावी असे आवाहन केले.
कोरोना हा संसर्गजन्य रोग असून कोरोनाबधित व्यक्तीच्या एक मीटरच्या संपर्कात आल्यावर याचा प्रादुर्भाव होतो. त्यामुळे जनतेने एकमेकांपासून किमान एक मीटर अंतरावर उभे राहणे गरजेचे आहे. जनतेला भाजीपाला, अन्न धान्य, मेडिकल मिळावे म्हणून या सर्व सेवांना राज्य सरकारने लॉकडाऊन मधून वगळले. त्यामुळे ही सर्व दुकान सुरू असून काही ठिकाणी गर्दी होत असल्याच्या बातम्या सातत्याने येत असल्यामुळे राज्याचे अन्न औषध प्रशासन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना डॉ राजेंद्रजी शिंगणे यांनी स्वतः रस्त्यावर उतरून शहरातील चिंचोले चौकात भरविण्यात आलेल्या भाजीपाला बाजाराला भेट दिली. याठिकाणी जाऊन त्यांनी तिथल्या विक्रेत्यांशी ग्राहकांशी चर्चा केली व त्यांना सोशल डिस्टसिंग पाळण्याचे आवाहन केले. त्यांनतर त्यांनी चिंचोले चौकातील एका मेडिकल स्टोअर्सला भेट देऊन सॅनिटाईझर, मास्क व औषधी याबाबतची माहिती घेतली. मेडिकल स्टोअर्स धारकांना व ग्राहकांना काही अडचणी येत आहेत का याची देखील त्यांनी विचारणा केली. तसेच शहरातील रिलायन्स मार्टला भेट देऊन त्याठिकाणी देखील सोशल डिस्टसिंग पाळल्या जाते का याची पाहणी त्यांनी केली.
यावेळी बोलताना ते म्हणाले की आज जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या आठ झाली असून जनतेने घाबरून जाण्याची गरज नाही परंतु आता जास्त काळजी घेण्याची गरज आहे. आवश्यकता असेल तरच घराच्या बाहेर पडावं, अन्यथा घरातच थांबून स्वतःची व स्वतःच्या कुटुंबाची काळजी घ्यावी असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

Related posts

मागण्या मान्य झाल्याने उद्याचा अमन मार्च स्थगित:ॲड प्रकाश आंबेडकर

nirbhid swarajya

लॉकडाऊन नाही तर STOP THE CHAIN

nirbhid swarajya

ट्रक अंगावरून गेल्याने ५५ वर्षीय इसमाचा मृत्यू

nirbhid swarajya
error: Content is protected !!