खामगाव : राज्याचे अन्न व औषध प्रशासनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी २० जून रोजी सकाळी येथील सामान्य रूग्णालयातील कोविड सेंटरला भेटदेवून पाहणी केली. तसेच त्यांनी रूग्णालयातील सुविधांचा आढावा घेतला. जिल्ह्यात कोरोना रूग्णांची संख्या वाढतच आहे. तर मलकापूर कोरोनाचे हॉटस्पॉट बनत असल्याने डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी खामगाव तालुक्याचा सुध्दा आढावा घेतला. कोरोना संसर्गाला रोखण्यासाठी शासनाकडून विविध उपाययोजना केल्या जात आहे. दरम्यान पालकमंत्री ना. डॉ. शिंगणे हे आढावा घेण्यासाठी जिल्हा दौऱ्यावर निघाले असता त्यांनी प्रथम येथील सामान्य रुग्णालयातील कोविड 19 वॉर्ड ची पाहणी केली. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ प्रेमचंद पंडित, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ निलेश टापरे यांनी डॉ. शिंगणे यांना रुग्णालयातील सुविधांची माहिती दिली. यावेळी जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांच्यासह वैद्यकीय अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
next post