सिंदखेडराजा:- तालुक्यात साठेगाव येथे गुरुवारी झालेल्या मुसळधार पावसात कडकडाट व वीजांचा कहर झाल्याने साठेगाव येथील रुख्मिनाबाई गजानन नागरे, वय ५० वर्षे ह्यांचा वीज कोसळून जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सविस्तर असे की, साठेगाव येथील गजानन संपत नागरे, वय ५५ व त्यांच्या पत्नी रुख्मिनाबाई गजानन नागरे, वय ५० हे दोघे पतीपत्नी शेतात निंदनाचे काम करीत असतांना. अचानक दुपारी तीन वाजेच्या दरम्यान आलेल्या पावसातुन स्वतःला वाचवण्यासाठी दोघांनी शेतातील बोरीच्या झाडाचा आसरा घेतला. त्याचवेळी त्या झाडावर वीज कोसळली. ह्या दुर्घटनेत रुख्मिनाबाई ह्या जागीच ठार झाल्या तर गजानन नागरे हे गंभीर जखमी झाले असून, त्यांना पुढील उपचारासाठी जालना येथील इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. सदर घटनेची माहिती मिळताच किनगावराजाचा पोलीस चमू घटनास्थळी दाखल झाला.
मृत रुख्मिनाबाई यांच्या मृतदेहाचा पंचनामा करीत शवविच्छेदन करण्यासाठी सिंदखेडराजा येथे रवाना करण्यात आला आहे.वृत्त लिहिपर्यंत ह्या संदर्भात पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली नव्हती.ठाणेदार युवराज रबडे , श्रावण डोंगरे शिवाजी बारगजे ह्यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरु असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.
previous post