खामगांव : स्व.जयेश झाडोकार यांच्या स्मृति प्रित्यर्थ त्यांच्या मित्रपरिवाराने भैय्यूजी महाराज आश्रम, ऋषी संकुल येथे साफसफाई मोहिम राबावण्यात आली. ऋषी संकुल हे आपल्या खामगावातील अतिशय रमणीय सुंदर स्थळ आहे. येथे भरपूर लोक निसर्गाचा आनंद घ्यायला येतात.पण त्यातील काही लोक निसर्गाच्या सानिध्यात येऊन आपले कर्तव्य विसरतात. आणि याच कारणामुळे या पूर्ण परिसरात प्लास्टिक व दारू च्या बॉटल चे काचेचे तुकडे भरपूर मोठ्या प्रमाणात आढळतात. हा कचरा प्रदूषण करून निसर्गाला तर भरपूर हानी करतोच पण सरपटणार्या प्राण्यांना यामुळे इजा होतात.
मनुष्याने स्वतःच्या आनंदासाठी प्राण्यांना आणि निसर्गाला किती प्रकारे त्रास द्यावा हा प्रश्न मानवा समोर उभा आहे. याच विचाराने स्व.जयेश झाडोकार यांच्या स्मृति प्रित्यर्थ दिव्या बरालीया, हर्षवर्धन मेश्राम, शीला मावळे, अश्विनी खेडेकर, ऐश्वर्या इंगळे, भाविका जांगिड़ , राजश्री महाले, शुभम पदमरस, रूपाली मेहता, मोहित बरालिया,योगेश इंदौरिया व इत्यादी मित्रपरिवाराने ऋषी संकुल येथे येऊन हा पूर्ण परिसर स्वच्छ केला. पर्यावरण दिनानिमित्त केलेला हा उपक्रम राबावण्यात आल्याचे पर्यावरण प्रेमी यांनी सांगितले आहे. यापुढे निसर्गाला किंवा प्राण्यांना त्रास होणार नाही याची काळजी खामगांव मधील नागरिकांनी घ्यावी अशी विनंती पर्यावरण प्रेमी यांनी केली आहे.