October 5, 2025
बुलडाणा

पर्यायी पूल गेला वाहून ; ट्रॅक्टर बचावला

बुलडाणा : रात्री झालेल्या जोरदार पावसाने बुलडाणा-धाड मार्गाचे काम सुरु असल्याने कोलवडजवळील पैनगंगा नदीवर बांधण्यात आलेला पर्यायी पूल वाहून गेला. एक पाणी टँकर देखील वाहता- वाहता बचावले आहे.

विदर्भाला मराठवाड्याशी जोडणारा बुलडाणा-धाड हा प्रमुख मार्ग आहे.सद्या या मार्गाचे काम सार्वजिनक बांधकाम विभागा कडून ‘हेम’ या योजने अंतर्गत जिजामाता रोड निर्मिति व पालसिद्ध कंस्ट्रक्शन करीत आहे. ग्राम कोलवड जवळून पैनगंगा नदी वाहते.या नदीवरचा जुना पुल तोडून नवीन पुलाचे निर्माण कार्य सुरु असून पर्यायी पुलावरुन वाहतूक वळविण्यात आली होती.११ जूनच्या रात्री जोरदार पाऊस पडल्याने पैनगंगा नदी दुथड़ी वाहु लागल्याने पर्यायी पुल सकाळी ६ वाजेच्या दरम्यान वाहून गेला. शिवाय पाण्याच्या टँकर घेऊन जाणा?या ट्रॅक्टर चालकाने वाहून गेलेल्या पूलावरुन ट्रॅक्टर टाकण्याचा धाडसी प्रयत केला होता मात्र सुदैवाने ट्रॅक्टर नदीत कोसळता कोसळता वाचला.

Related posts

अवैधरित्या दारूची वाहतूक करताना एकास अटक

nirbhid swarajya

जिल्ह्यात आजप्राप्त 301 कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’; तर 33 पॉझिटिव्ह

nirbhid swarajya

अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या पथकाने पकडला गुटखा, शस्त्र व दारू

nirbhid swarajya
error: Content is protected !!