ती कामिका एकादशीची संध्या होती. भास्कर उदास भासत होता. जणू त्याला अपराध बोध होत होता की आज मी का उगवलो. ही महाप्रयाणची महायात्रा बघावयास ! लवकर लवकर तो अस्त झाला आणि एकनिष्काम कर्मयोगी ही!
त्याच वेळी , दूर दूर. . . . क्षितिजा पलीकडे. . .कोठे तरी. . . .
आज तिथे सारा आसमंत उजळुन निघाला होता. अवघ्या ४ दिवसानंतर अमावस्या होती, मात्र तिथे आज पूर्णिमा होती जणू.
अचानक . . . तिथे इतका प्रकाश झाला की समोर चे दृश्य दिसेनासे झाले. फक्त एक आवाज आला, “ आलास शिवा ? ये आधी आपण भेटू या ” आणिहळु हळु दोन मानवाकार आकृति एकाकार होताना दिसल्या.
सगळीकडे दीप पाहुन भाऊ म्हणाले, “आज कोणता सणआहे महाराज? ”
महाराज किंचित हसले आणि म्हणाले , “ कर्मयोगी जो परती घरा, तोची आम्हा दिवाळी दसरा! ”
हे ऐकताच भाऊंचे डोळे पाणावले. अश्रुपुरीत नयनांनी त्यांनी महाराजांना प्रश्न विचारले , “ महाराज मला एक विचारायचे आहे. मी माझे कार्य बजावताना कूठे चुकलोतर नाही न? सेवा कार्य करता करता मी कुठे उणा तर पडलो नाही ना ? जाणता अजाणतामी कुणा भक्तालादुखवले तर नाही ना ? ”
महाराज पुनः हसले, “ वेडाच राहिला रे भोळ्या शंकरा,वेडाच !अरे शिवा तुझ्या अविरत सेवेची मी काय प्रशंसा करु. शब्द तोड़के पड़तीलरेमला. ”
भाऊंच्या भावना पुन्हा उचंबळून आल्या. ते कंपित स्वरात म्हणाले, “महाराज, अर्जुनाचा पराक्रम कृष्णविणा आणि मारुतीरायाची कामगिरी रामाविणाव्यर्थच. दोघांच्या मागे कृष्ण आणि रामाचाच हाथ ! महाराज, कर्ता करविता आपणच ! बाकी सर्व फक्त माध्यम. . . .फक्त माध्यम ! ”
महाराज अचानक गंभीर झाले, “ कारेशिवा, तुला तर मी मोक्षच्या सदनासपाठविले होते. तू इथे कसा ? ”
भाऊंनी हल्केच स्मित केलेआणि हळूच पुटपुटले, “क्षमा असावी महाराज, मी तिथुनपळुन आलो.”
“ अरे पण वेड्या का? ”
“ एकदा मी मोक्षचा मोह केला कीकायमचा तिथे मुक्कामी. काय करु
या ऐश्वर्याचे ! जो निर्भेळ आनंद आपल्या सेवेत आहे, आपल्या भू-लोकावरील भक्तांच्या सेवेत आहे,तो स्वर्गलोकी नाही महाराज. मला पुन्हा-पुन्हा, वारंवार भू-तली पाठवा. माझे सेवा व्रत मी पुनः सुरूकरतो. ”
महाराज पुनः हसले, “ वेड्या, लोक मोक्षसाठी जीवनभर माझी साधना करतात, आणि एक तू. . . . . . .”
त्यांनी एक दीर्घ निश्वास टाकला आणि म्हणाले, “ बरोबर आहे, रामा पेक्षा मारुती वरचढ़.म्हणून तर रामा पेक्षा मारुती ची मंदिरे जास्त!आजपर्यंत परिसही फक्त एक कल्पना होती. तू मात्र खरापरिस ! जा तुझी गरज या भूतली नेहमीराहणार आणि तुझ्या मूळे, तुझ्या परिसस्पर्शाने बाकी सगळ्यांचे ही सोने होईल!फक्त थोड़ा वेळ थांब , थोड़ी विश्रांति घे.मला सुध्दा पुनः जायचेचआहे.तो पर्यंत थोड़ासा अल्पआराम!आपण लवकरच निघु! तो पर्यंत आत तर ये.” म्हणत महाराजांनी स्वतः दरवाजा उघड़ला आणि. . . . . .
त्याच क्षणी माझे डोळे ही उघड़ले.
मी माझ्या शयन कक्षात होतो. तेथे मंद मंद सुवास दरवळत होता. समोरच्या घड्याळात सकाळचे ४ वाजले होते.ब्रम्ह-समई पडलेले हे स्वप्न कितीखरे ठरेल हे त्या परमपित्यालाच ठाऊक ! भक्त आणि भगवंत केव्हा,कुठे, कसे पुन्हा येतील हे त्या नियतीलाच माहीत !
एक मात्र खरे,भक्त आणि भगवंताची ही दुर्मिळभेट, माझ्या आठवणींच्या कप्प्यात अग्रस्थानी राहिल आणि एखाद्यादुर्बल क्षणी जर का चित्त- मोहा पोटी, लाभा-पोटी, चित्त जर नीतिमत्ता सोडू लागले तरत्यास ही आठवण लगेच लगाम घालेल, इतके मात्र निश्चित !
जय गजानन
गण गण गणात बोते !