खामगांव : काळी पिवळी टॅक्सी वाहनचालकांना परमिट नुसार वाहन चालविण्याचे परवाने देण्यात यावी अशी मागणी एका निवेदनाद्वारे शिवशक्ती काळीपिवळी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी बुलडाणा यांच्याकडे केली आहे.
शिवशक्ती काळीपिवळी टॅक्सी संघटना खामगाव यांच्यावतीने 6 जून रोजी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की कोरोनाविषाणू संक्रमणामुळे गत दोन महिन्यापासून काळीपिवळी टॅक्सी वाहतूक पूर्णपणे बंद आहे परिणामी खामगाव तालुक्यात जिल्ह्यातील अनेक काळीपिवळी चालक बेरोजगार झाले आहेत त्यामुळे त्यांची उपासमार होत आहे. आगामी काळात सुरक्षित बेरोजगारांना आधार देण्यासाठी तसेच त्यांच्या कुटुंबीयांना जगविण्यासाठी काळी पिवळी टॅक्सी धारकांना परमिट अनुसार वाहन चालविण्याचा परवानगी द्यावी असे म्हटले आहे. निवेदनावर संघटनेचे अध्यक्ष भास्कर आखरे यांची स्वाक्षरी आहे.