November 20, 2025
बातम्या

परप्रांतीय मजुरांना मारहाण करणारे दोन पोलीस कर्मचारी मुख्यालयी संलग्न

तेरा परप्रांतीयावर साथरोग कायद्या अंतर्गत गुन्हे दाखल

खामगांव : बुलडाणा जिल्ह्यातील खामगांव येथे क्वारंटाईन असलेल्या परप्रांतीय मजुरांना पोलिस कर्मचाऱ्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना काल उघडकीस आली होती घटनेमुळे बुलडाणा जिल्हात खळबळ निर्माण झाली होती. या घटनेची दखल घेत जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ दिलीप पाटील भुजबळ यांच्या आदेशाने या दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांना तात्काळ पोलीस मुख्यालयी संलग्न केले असून १३ परप्रांतीयांवर शिवाजी नगर पोलीस स्टेशन मध्ये साथरोग कायद्या अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

बुलडाणा जिल्ह्यात अडकलेल्या ५४ परप्रांतीय मजुरांना खामगाव येथील वस्तीगृहामध्ये ४० दिवसांपासून क्वारंटाईन करण्यात आले होते, या क्वारंटाईन केलेल्या १३ परप्रांतीय मजुरांनी वसतीगृहात ड्युटी वर असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांने रात्री त्यांना मारहाण केल्याचा आरोप केल्याने खळबळ निर्माण झाली होती. त्यानंतर माजी आमदार दिलीप कुमार सानंदा, नगरसेवक, शहरातील समाजिक कार्यकर्ते व पत्रकार त्या ठिकाणी पोहचले होते. माजी आमदार सानंदा यांनी गृह मंत्री अनिल देशमुख यांच्या कडे प्रकरणाची तक्रार केली होती. आज याची दखल घेत घटनेची चौकशी करण्याकरिता पोलीस कॉन्स्टेबल गजानन चोपडे व बाळकृष्ण फुंडकर हे दोघेही तात्काळ मुख्यालयी संलग्न केले गेले आहेत.

मात्र अनेक दिवसांपासून हे मजूर घरी जाण्यासाठी गोंधळ घालत होते व त्यांनी वास्तव्यास असलेल्या ठिकाणची तोडफोड सुध्धा केली आणि घटनेच्या दिवशी देखील या मजुरांनी मध्यरात्री गोंधळ घातला होता
त्यामुळे उपस्थित पोलिसांनी त्यांच्यावर सौम्य बळाचा वापर केला, या प्रकरणाची निपक्ष पणे चौकशी व्हावी यासाठी दोन्ही पोलीस कर्मचारी गजानन चोपडे व बाळकृष्ण फुंडकर हे तात्काळ मुख्यालयी संलग्न केले असून आपत्ती व्यवस्थापन कायदा व साथ रोग कायद्यानुसार १३ मजुरांवर शिवाजी नगर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत अशी माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ दिलीप पाटील भुजबळ यांनी दिली आहे. तसेच ज्यावेळी ही घटना घडली तेंव्हा दोन पोलीस कॉन्स्टेबल व्यतिरिक्त एक अधिकारी आणि दोन कर्मचाऱ्याची वसतिगृह येथे ड्युटी होती मात्र ते गैरहजर असल्याचे समजते ? वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गैरहजर असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी होत आहे .

Related posts

लॉकडाऊन मध्ये अवैध दारू साठ्यावर पोलिसांची कारवाई

nirbhid swarajya

iPhone 8 Leak Reiterates Apple’s Biggest Gamble

admin

गायगांव बुद्रुक येथील उपसरपंचा विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

nirbhid swarajya
error: Content is protected !!