खामगाव : कोरोना महामारीच्या काळात सुरू असलेल्या लॉकडाऊन दरम्यान टांझानिया येथून वंदेभारत अंतर्गत आलेल्या ७ जणांना येथील अंजुमन हायस्कूलमध्ये क्वारंटाइन करण्यात आले आहे. याबाबत असे की, कोरोना महामारीने संपूर्ण जगात थैमान घातले असून वाढत्या संसर्गाने अनेकांना आपले प्राण गमवावे लागले. दरम्यान भारतातून परदेशात गेलेल्यांना परत आणण्यासाठी भारत सरकारतर्फे वंदेभारत मिशन अंतर्गत परत आणल्या जात आहे. तर याच मिशन अंतर्गत बुलडाणा जिल्ह्यातून टांझानिया येथे गेलेले ७ जण बुलडाणा जिल्ह्यात परतले आहेत. दरम्यान या ७ जणांना येथील जलंब नाका स्थित अंजुमन हायस्कुल गेल्या सात ते आठ दिवसांपासून क्वारंटाईन करण्यात आले असून सोमवार ८ जून रोजी या सर्वांच्या तपासण्या येथील सामान्य रूग्णालयात करण्यात आल्या आहेत तर त्यांचे स्वॅब वैद्यकीय तपासणीसाठी पाठविण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.
previous post