दिवसेंदिवस पत्रकारांवरील वाढत्या हल्ल्याने पत्रकारांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर होत असल्याच्या पार्श्वभूमीवर पत्रकार संरक्षण कायदा राज्यात लागू करण्यात आला आणि याच कायद्यांतर्गत विदर्भातील पहिला गुन्हा बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव मध्ये दाखल करण्यात आला आहे.या प्रकरण एक आरोपी अटक करण्यात आली मात्र मुख्य आरोपी अद्याप हि फरार आहे आरोपींना तात्काळ अटक करा अन्यथा पत्रकार आंदोलन करण्यार असल्याची माहिती पत्रकार संघटना यांनी दिली आहे
खामगाव तालुक्यातील शिरसगाव देशमुख ग्रामपंचायत हद्दीत अग्रवाल फटाका केंद्र हे अवैधरित्या सुरु असल्याने जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने हे गोडाऊन सील करण्याची कारवाई सुरू असताना त्याचे वृत्त संकलन करण्यासाठी खामगाव येथील एका वृत्तपत्राचे प्रतिनिधी शिवाजी भोसले हे घटनास्थळी गेले असताना त्यांना आरोपी सुनील अग्रवाल मुलगा संगीत अग्रवाल व बब्बू गुजरीवाल यांनी मोबाईल हिसकावून घेत मारहाण केली , यावरून खामगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीवरून
प्रसार संस्था हिंसक कृत्य मालमत्तेचे नुकसान अधिनियम 2017 कलम 3 व 4 प्रमाणे गुन्हा दाखल केला पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले असून बब्बू गुजरीवाल याला 12 जानेवारी पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली असून फरार असलेल्या अग्रवाल पिता – पुत्रांचा पोलीस शोध घेत आहेत.तर या कारवाईमुळे जिल्ह्यातील पत्रकारांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे