शेगाव : वृत्तपत्र विक्रेता व पत्रकार बांधवांच्या संघटना वेगवेगळ्या असल्या तरी अडीअडचणी सोडविन्याच्या दृष्टिने एकसंघ राहावे,वृत्त पत्र विक्रेता हा घराघरात विचार पोहचत असून वैचारिक दूत आहे, असे मत शेगाव पत्रकार संघाचे संस्थापक तथा बुलडाणा जिल्हा पत्रकार संघाचे सदस्य अनिल उंबरकर यांनी व्यक्त केले.आळसणा रोड वरील विश्वनाथ नगर 3 येथे शेगाव शहरातील वृत्तपत्र विक्रेता बांधवांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. वृत्त पत्र विक्रेता दिनाचे औचित्य साधून वृक्षारोपणही करण्यात आले. त्याप्रासंगिक ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून एमईसीबी सेवनिवृत्त कर्मचारी रामेश्वरअन्ना सोळंके यांची तर प्रमुख उपस्थिती म्हणून कैलास खंडेराव पाटील होते.याप्रसंगी शेगाव वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे राज्य कार्यकारिणी सदस्य प्रकाश उन्हाळे पाटील, तालुकाध्यक्ष संजय स्वामी, मुरलीधर काळे,गोविंद धंदर, राजेश तायडे, नारायण ठोसरे, पी टी पांडे यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी शेगाव पत्रकार संघाचे उपाध्यक्ष नंदु कुळकर्णी,कोषाध्यक्ष ज्ञानेश्वर कुकडे, सदस्य राजकुमार व्यास,नारायण दाभाडे, ज्ञानेश्वर ताकोते, नितिन पहुरकर आदींची उपस्थिती होती. संचलन शेगाव पत्रकार संघाचे अध्यक्ष दिनेश महाजन तर आभार शेगाव पत्रकार संघाचे सचिव अमर बोरसे यांनी मानले.