रात्री 12 वाजता चे सुमारास घडली घटना..सर्व घटना CCTV मध्ये कैद..
बुलडाणा : बुलडाणा येथील सिटी न्यूज चॅनेलचे संपादक जितेंद्र कायस्थ याची कार अज्ञात आरोपी त्यांनी पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केल्याची घटना शुक्रवारी रात्रीच्या सुमारास घडली या प्रकरणी बुलडाणा पोलिसात अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर प्रकार हा सीसीटीव्हीमध्ये कैद झालेला असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहे.
मिळालेल्या माहीतनुसा रबुलडाणा शहरातील सिटी न्यूज चे चॅनल मुख्य संपादक जितेंद्र कायस्थ यांची कार जाळण्याचा प्रयत्न अज्ञातांनी रात्री साडेअकरा वाजता केला होता. परंतु प्रसंगावधान राखल्याने गाडीचे जास्त नुकसान झाले नाही…याप्रकरणी बुलडाणा शहर पोलिसात तक्रार देण्यात आली असुन अज्ञात युवका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे ..पुन्हा पत्रकाराच्या गाडीवर बुलडण्यात झालेला हा दुसरा हल्ला आहे. कृत्य करणाऱ्याला तात्काळ अटक करावी व पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करावे अशी मागणी बुलडाणा पत्रकार संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे