बुलडाणा : पती पत्नीच्या वादातून मद्यधुंद अवस्थेत पती चक्क शंभर मीटर उंच असलेल्या BSNL च्या टॉवर चढला आणि तब्बल तीन तास त्याला खाली उठवण्यासाठी शासनाची एकच धांदल उडाली. सासर कडील काही व्यक्तींवर कारवाही करण्यासाठी प्रयत्न करण्यात आला. बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मागील BSNL च्या टॉवर वर दुपारी तीन वाजता चे सुमारास एक इसम चढला तात्काळ घटनास्थळी पोलिस , महसूल ,आणि नगर परिषदेचे अधिकारी दाखल झाले आणि त्याला खाली उतरवण्यास आवाहन करू लागले.
दरम्यान इसमाने खिशातील पत्नीचे पॅन कार्ड आणि आधार कार्ड खाली टाकले त्यावरून त्याचे नाव गजानन रोकडे असल्याचे निष्पन्न झाले , त्याचे गाव देखील सव हे असल्याची माहिती मिळाल्याने काही वेळात त्याची आई व दोन्ही मुलांना प्रशासनाने घटनास्थळी आणलं आणि त्यांच्यामार्फत देखील विनवणी केली , सोबतच त्याची पत्नी अनिता ही माहेरी जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर येथे असल्याने प्रशासनाने तिला देखील आणण्याची व्यवस्था केली , त्याचे इतर नातेवाईक आणि प्रशासनाने जवळपास तीन तास त्यांच्या सोबत दूरध्वनी द्वारे तसेच लाऊडस्पीकर द्वारे संपर्क केला त्याच्या सर्व मागण्या मान्य करण्याचे आश्वासन शासनाने दिले आणि खाली उतरण्याची विनंती केली. त्यानंतर तब्बल तीन तासानंतर हा विरु अखेर खाली उतरला.