आ.अॅड. फुंडकर यांनी केला सफाई कर्मचारी व कोरोना योध्दांचा सत्कार
खामगाव : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस भाजपाच्यावतीने सेवा सप्ताह म्हणून साजरा करण्यात येत आहे. खामगाव भाजपाच्या वतीने आज ओंकारेश्वर स्मशानभूमी येथे आ.अॅड. आकाश फुंडकर यांच्या हस्ते स्वच्छता अभियानास सुरूवात करून या सेवा सप्ताहाचा शुभारंभ करण्यात आला. भारताचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस दि.17 सप्टेंबर रोजी आहे. त्यांच्या वाढदिवस दरवर्षी सेवा सप्ताह म्हणून भाजपा कार्यकर्ता विविध प्रकारचे सेवा कार्य करुन साजरा करतात.या सेवा सप्ताह दरम्यान खामगांव शहर भाजपाच्या वतीने विविध सेवा कार्य करण्यात येत आहेत. या सेवा सप्ताहाची सुरुवात आज मंगळवार दि.15 सप्टेंबर रोजी आ. अॅड आकाश फुंडकर यांच्या हस्ते खामगांव शहरातील ओंकारेश्वर स्मशानभूमी येथे साफ सफाईव्दारे करण्यात आली. यावेळी आदिंची उपस्थिती होती. या सेवा सप्ताहांतर्गत उद्या दि.16 सप्टेंबर रोजी शहरातील सर्व प्रभागांमध्ये नगरसेवक व पदाधिकारी हे बुथ निहाय स्वच्छता व सॅनिटायझेशन करणार आहेत. यासोबतच एकदाच वापरल्या जाणार्या प्लास्टीक पासून मुक्तीचा संकल्प देखील करण्यात येणार आहे. तसेच दि. 17 सप्टेंबर रोजी रुग्णांना फळ वाटप करण्यात येणार आहे. दि. 18 सप्टेंबर रोजी खामगांव शहरात विविध ठिकाणी वृक्षारोपण, दि.19 सप्टेंबर रोजी बौध्द स्मशानभूमी व मुक्तीधाम स्मशानभूमी येथे आतील व बाहेरील परिसर साफसफाई व स्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे. यासोबतच इतर समाजोपयोगी सेवा कार्य करुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे मोदी यांनी केलेल्या कार्याबद्दलची माहीती देण्यात येणार आहे, अशी माहिती प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली.