महाराष्ट्रासाठी ऐतिहासिक क्षण…
सोहळ्याचं थेट प्रक्षेपण दिसणार मेहकर येथील फर्दापुर टोल प्लाझावर फर्दापुर टोल प्लाझा येथे मोठया संख्येने सहभागी व्हा- आ.ॲड.आकाश फुंडकर हुप्रतिक्षित नागपूर- मुंबई द्रुतगती समृद्धी महामार्गाच्या नागपूर ते शिर्डी या पहिल्या ५२० किमी टप्प्याचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ११ डिसेंबर रोजी होणार आहे. या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी तसेच विदर्भातील आमदार खासदार उपस्थित राहतील. या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण बुलढाणा जिल्हयातील मेहकर येथील फर्दापुर टोल प्लाझा येथे करण्यात येणार आहे तरी बुलढाणा जिल्हयातील नागरीकांनी व कार्यकर्त्यांनी या ऐतिहासिक सोहळयाचे साक्षी होण्यासाठी या कार्यक्रम स्थळी नागरीक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठया संख्येने रविवार दि.11 डिसेंबर रोजी सकाळी 9.30 वा सहभागी व्हावे असे आवाहन भाजपा जिल्हाध्यक्ष तथा खामगांव विधानसभा मतदार संघाचे आमदार ॲड.आकाश फुंडकर यांनी केले आहे.
ज्याची संपूर्ण राज्याला उत्सुकता लागून राहिलेली होती त्या बहुप्रतिक्षित नागपूर- मुंबई द्रुतगती समृद्धी महामार्गाच्या नागपूर ते शिर्डी या पहिल्या ५२० किमी टप्प्याचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ११ डिसेंबर रोजी या महामार्गावरील वायफड नाक्याजवळ नागपूर येथे लोकार्पण सोहळ्यासाठी आयोजन करण्यात आले आहे. देशाचे पंतप्रधान मा.श्री नरेंद्रभाई मोदी यांच्या शुभ हस्ते “हिंदुहृदसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे नागपूर मुंबई समृद्धी महामार्गाचे” लोकार्पण मोठया थाटात संपन्ऩ होणार आहे. हा महामार्ग खुला झाल्यानंतर नागपूर ते शिर्डी अंतर १० तासांऐवजी ५ तासांत कापता येईल.या कार्यक्रमाला पंतप्रधान मोदी यांच्यासह राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी तसेच विदर्भातील आमदार खासदार उपस्थित राहतील. उद्घाटनानंतर पंतप्रधान मोदी काही किलोमीटरचा प्रवास करतील तसेच छोटेखानी सभेला संबोधितही करतील. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचा अत्यंत महत्वाकांक्षी समजल्या जाणाऱ्या समृध्दी महामार्गाचे देशाच्या पंतप्रधान मा.नरेंद्रभाई मोदीजींच्या हस्ते होणाऱ्या लोकार्पण समारंभाचे साक्षीदार होण्यासाठी बुलढाणा जिल्हयातील मेहकर येथील फर्दापुर टोल प्लाझा येथे थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे तरी बुलढाणा जिल्हयातील नागरीकांनी व कार्यकर्त्यांनी या ऐतिहासिक सोहळयाचे साक्षी होण्यासाठी या कार्यक्रम स्थळी बहुसंख्य़ जनतेने, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठया संख्येने रविवार दि.11 डिसेंबर रोजी सकाळी 9.30 वा सहभागी व्हावे असे आवाहन भाजपा जिल्हाध्यक्ष तथा खामगांव विधानसभा मतदार संघाचे आमदार ॲड.आकाश फुंडकर यांनी केले आहे.