स्व. महात्मा गांधी यांचे विचार सोडून काँग्रेस नीच विचारांची पातळीवर जात आहे -अँड.आकाश फुंडकर
खामगांव : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंजाब दौऱ्यात सुरक्षेत त्रुटी राहिली. यावेळी त्यांच्या वाहनांच्या ताफ्याच्या मार्गातच शेतकरी आंदोलन करीत होते. त्यामुळे पंतप्रधांना रस्त्यात थांबावे लागले व आयोजित केलेल्या सभेला हजेरी न लावताच परत जावे लागले होते. या विषयावर देशभरात आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. भाजपने देशभरात त्याच्या निषेधार्थ विविध उपक्रम सुरु केले आहेत. या पार्श्वभूमीवर खामगांव भारतीय जनता युवा मोर्चा तर्फे शहरात स्थानिक गांधी पुतळ्यासमोर मूक निदर्शने करण्यात आले. यावेळी भाजपा आ.आकाश फुंडकर यांनी सांगितले की, पंजाबमधील फिरजपूर येथे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षतेत राज्यातील काँग्रेस सरकारने दुर्लक्ष करून मोठी चूक केली आहे. परंतु, देवाच्या कृपेने पंतप्रधान या हल्ल्यातून सूखरूप वाचले. यापूर्वी सुरक्षेच्या त्रुटींमुळे देशाने दोन पंतप्रधान गमावले आहेत. पंतप्रधानांच्या सुरक्षतेत केलेला निष्काळजीपणा हा अक्षम्य गुन्हा आहे आणि काँग्रेस प्रणित पंजाब सरकारचा कट आहे. पंतप्रधान मोदी पंजाब दौऱ्यावर असताना त्यांना रस्त्यावर अडविले.अर्थातच ‘सेक्युरिटी ब्रिच’ झाले. पंतप्रधान कोणत्याही राज्यात गेल्यावर एक ठराविक प्रोटोकॉल पाळणे सर्वच राज्य सरकारांना सक्तीचे असते. असे असताना सेक्युरिटी ब्रीच ही एक गंभीर चूक आहे. गांधीजींच्या विचारावर चालणारी काँग्रेस एका नीच विचारावर जाताना समग्र देश पाहत आहे. त्यांनी सोडलेली पातळीतून त्यांनी बाहेर पडावे तसेच त्यांना देव सद्बुद्धी देवो. काँग्रेस सरकार कडून करण्यात आलेले कृत्य हे बुद्धीला न पटण्यासारखी आहे. या प्रकारामागे विरोधकांचा हात तर नाही, असा प्रश्न देशातील प्रत्येक नागरिकांपुढे आहे. पंतप्रधानांच्या सुरक्षेमध्ये मोठी चूक करून त्यांच्या जीवितास धोका निर्माण करणाऱ्या काँग्रेसी पंजाब सरकारचा जाहीर निषेधासाठी भाजपकडून मुक निदर्शने करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. या मुख्य निदर्शनामध्ये भाजपाचे जिल्हाध्यक्ष तथा खामगाव मतदारसंघाचे आ. आकाश फुंडकर, जिल्हा उपाध्यक्ष संजय शिंनगारे, खामगाव शहराध्यक्ष शेखर पुरोहित,नगरसेवक सतीष अप्पा दुडे, नगरसेवक राकेश राणा, नगरसेवक गणेश सोनोने, आशिष सुरेखा जितेंद्र पुरोहित, संजय शर्मा, पवन गरड, कैलास देवताळु, सत्यनारायण थानवी, दिलीप गुप्ता, शुभम देशमुख, लक्ष्मण वराडे, संदीप राजपूत, शंभू शर्मा, रोशन गायकवाड, हितेश पद्मगिरवार, यश आमले, अमोल राठोड, पवन तनपुरे,आकाश मिश्रा, प्रसाद एदलाबादकर यांच्यासह आदी भाजप युवा कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले.