खामगाव :नुकताच H.S.C बोरडाचा निकाल लागला.या परीक्षेत खामगावच्या श्री अखिल खीमजी नॅशनल हायस्कूल व ज्युनियर कॉलेज मध्ये शिकत असलेली कुमारी स्नेहल संपत ढोले हिने कला शाखेचे त 83% गुण प्राप्त करून महाविद्यालयातून प्रथम येण्याचा मान पटकावला आहे तर श्रीकृष्ण तोंडे या विद्यार्थ्याने सुद्धा कला शाखेत 74.33% गुण प्राप्त करून द्वितीय क्रमांक प्राप्त केला आहे त्यांच्या यशाबद्दल नॅशनल हायस्कूल व ज्युनियर कॉलेजच्या वतीने दोन्ही विद्यार्थ्यांचा व त्यांच्या यशामध्ये मोलाचा योगदान देणाऱ्या त्यांच्या पालकांचाही सत्कार यावेळी करण्यात आला. यावेळी नॅशनल हायस्कूल व ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य डॉ.भरगडे सर प्राचार्य सातपुते सर व प्राचार्य जसमतीया सर उपस्थित होते.स्नेहल ढोली ही विद्यार्थ्यांनी सामान्य परिवारातील असून तिला भविष्यात स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून प्रकाशकीय अधिकारी व्हायचे आहेती आपल्या यशाचे श्रेय प्राचार्य सौ शहा मॅडम उपप्राचार्य सोनटक्के मॅडम आई वडील व संपूर्ण प्राध्यापक वर्गांना देते.
previous post