शेगाव : कोविड १९ संसर्गजन्य रोगामुळे जगासह आपण हतबल झालेलो आहोत. कोरोनाच्या
संकटात कसे जगायचे याच्या मार्गदर्शक सूचना केंद्र आणि राज्य सरकारांनी दिलेल्या आहेचं त्यानुसार सर्वच जण आपल्या परीने राष्ट्रीय सहकार्य करीत आहेत. सध्या बुलडाणा सामान्य रुग्णालयात रक्ताच्या साठ्याचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झालेला आहे.त्यामुळे रक्तदानाचे आव्हान ही बाब केवळ नेहमीप्रमाणे सेवाकार्य म्हणून उरली नसून जीवन-मरणाचा प्रश्न म्हणून समोर आला आहे. कारण जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या रक्तपेढीत रक्ताच्या फक्त २० ते ३० बॉटल शिल्लक आहेत. म्हणजे आता केवळ तुटवडा नाही तर रक्ताशिवाय कुणाचे प्राण जाण्याची वेळ आली आहे. ही वार्ता कळताच राष्ट्रीय पातळीवरील रायफल शुटर श्रीकांत कदम यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता त्वरीत शेगाव येथील शासकीय सामान्य रुग्णालयात जाऊन काल रक्तदान केले असून क्रीडा क्षेत्रातील तरुण खेळाडूंना रक्तदान करण्यास आवाहन केले आहे. ही आर्त साद…. बुलडाणा जिल्हा व संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येकाच्या हृदयाला भिडू द्या….. तुम्ही रक्तदाता नाही तर जीवनदाता बनणार् आहात हे लक्षात घ्या!
श्रीकांत कदम हे देशाचे नांव लौकिक करण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करीत आहेत त्यांनी रायफल शूटिंगमध्ये जिल्हा, विभागीय, राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय पातळीवर अनेक मेडल मिळविलेले आहे.
आता ते इंडिया टिंम साठी मागच्या वर्षापासून दिल्ली, केरळमध्ये ट्रायल देत आहेत. सध्या ते दिल्ली, मुंबई व पुणे येथे रायफल शूटिंगचा सराव करीत आहे. परंतु कोविड १९ च्या लॉकडाऊन मुळे आपल्या गावी आले आहेत व रक्तदान करण्याचे आवाहन करत आहे.