December 28, 2024
खामगाव जिल्हा बुलडाणा महाराष्ट्र राजकीय विदर्भ शेतकरी

नुकसानीचे पंचनामे न करता शेतकऱ्यांना जीवंतपणी तात्‍काळ आर्थिक मदत द्यावी- मनसेची मागणी

खामगाव : खामगाव तालुक्यासह संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झालेले असून शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे.त्‍यामुळे सरकारने पंचनाम्‍याच्‍या भानगडीत न पडता सरसकट हेक्टरी ३० हजार रुपये मदत द्यावी अशी मागणी खामगाव मनसेच्यावतीने उपविभागीय अधिकारी यांच्‍या मार्फत एका निवेदनाद्वार राज्‍याचे मुख्यमंत्री आणि कृषीमंत्री यांना केली आहे. मनसेने दिलेल्या निवेदनात नमुद आहे की, गेल्या महिन्‍या भरापासुन संपूर्ण महाराष्ट्रासह बुलडाणा जिल्ह्यात सुध्दा अतिवृष्टी झालेली आहे. यामुळे जिल्हाभरातील शेतकऱ्यांच्या शेतमालाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्‍यामुळे शेतकरी बांधव हवालदिल झाला असून शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे.

त्‍यातच यावर्षी सुरुवातीला पावसाने उशीरा हजेरी लावल्‍याने व अनेक ठिकाणी बाेगस बियाणे उगवलेच नसल्‍याने जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावले आहे.आधीच कोरोनामुळे ग्रामीणसह शहरी भागात देखील रोजगाराचा प्रश्न गंभीर झाला असून अतिवृष्टीमुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्‍याने शेतकरी संकटात सापडला आहे. शेतकऱ्यांचे सोयाबीन, मूंग, उडीड, कपाशी या शिवाय इतर पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले दिसून येते. याशिवाय फळपिकांनाही मोठया प्रमाणावर फटका बसला आहे. जिल्ह्यातील केळी, पपई, डाळींब आदी फळबागांनासुद्धा अतिवष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. तरी शासनाने पंचनामे न करता शेतकऱ्यांना जीवंतपणीच सरसकट हेक्‍टरी ३० रुपये मदत द्यावी अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असेही निवेदनात नमदू आहे. सदर निवेदनाच्‍या प्रति राज्‍याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे ,कृषीमंत्री दादासाहेब भुसे, बुलडाणा जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी खामगाव यांना दिले आहे.

Related posts

गरिबांच्या फ्रीज ला मंदी चा सामना करत पुन्हा सुगीचे दिवस

nirbhid swarajya

जिल्ह्यात आज प्राप्त 607 कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’; तर 112 पॉझिटिव्ह

nirbhid swarajya

जिल्ह्यात प्राप्त 302 कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’; तर 64 पॉझिटिव्ह

nirbhid swarajya
error: Content is protected !!