खामगांव : नीट, जेईई परिक्षा घेण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाचा निषेध करण्यासाठी काँग्रेसच्या वतीने आज खामगांव येथील उपविभागीय कार्यालयावर धरणे आंदोलन करण्यात आले.
देशात कोरोना महामारीचे भीषण संकट समोर आले असुुन दररोज कोरोना बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. अश्या भयंकर परिस्तिथीमध्ये विद्यार्थी,शिक्षक व कर्मचारी वर्गाच्या जिवताची पर्वा न करता केंद्रशासनाने नीट, जेईई परिक्षा घेण्याचे ठरविले आहे. त्यामुळे पालक व विद्यार्थ्यांमध्ये सुरक्षेला घेवुन एक मोठी चिंता निर्माण झाली आहे. देशभरातील विद्यार्थी मोठ्या प्रमाणात मोदी सरकारच्या विरोधात नाराजी व्यक्त करीत आहे. विद्यार्थ्यांचे आरोग्य व भविष्याची चिंता व्यक्त करीत या परिक्षा पुढे ढकलण्यात याव्या या मागणी करीता भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने मोदी सरकारच्या आडमुठ्या हटवादी भुमीकेला विरोध करीत परिक्षा ढकलण्यात याव्या या मागणीसाठी अखिल भारतीय काॅंग्रेस कमिटीचे प्रदेशध्यक्ष ना.बाळासाहेब थोरात तसेच बुलडाणा जिल्ह्याध्यक्ष राहुल बोन्द्रे यांच्या मार्गर्दशनाखाली केंद्र सरकारच्या विरोधात धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले होते.आज अखिल भारतीय काॅंग्रेस कमिटीच्या वतीने माजी आ. दिलीपकुमार सानंदा यांच्या उपस्थितीत नरेंद्र मोदी यांना उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले.
या आंदोलनाकरीता शासनाने दिलेल्या सुचनांचे व नियमांचे तंतोतंतपणे पालन करुन काँग्रेसचे आजी-माजी नगरसेवक, आजी-माजी जि.प., पं.स.सदस्य,युवक काॅंग्रेस, एनएसयुआयचे पदाधिकारी,सदस्य, फ्रंटल सेलचे आघाडीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते व विद्यार्थ्यांनी मोठया संख्येने उपस्थित होते.