खामगाव: निसर्गाची समृद्धी या ग्रुप तर्फे राष्ट्रीय महामार्ग ६ वरील जलंब नाका ते निर्मल मेडिकल तसेच जलंब नाका ते वन विभाग कार्यालयापर्यंत डिव्हायडर वर ४०० झाडांची लागवड करण्यात आली. अलिकडच्या काळात ऑक्सीजन अर्थात प्राणवायु विकत घ्यावा लागेल, असे जेव्हा बोलल्या गेले, तेव्हाही आपण यातील गांर्भीय लक्षात घेतले नाही. कोरोनाच्या या काळात प्राणवायुचे मोल आता लक्षात आले आहे. निसर्ग ज्या काही शुध्द गोष्टी आपल्याला देत आला आहे. त्या जर पुढच्या पिढीपर्यंत तेवढयाच शुध्द ठेवणे, हे आपल्या हातात आहे. पुढच्या पिढीपर्यत जर ही शुध्दता अर्थात संतुलित पर्यावरण पोहचवायचे असेल तर यासाठी आपण प्रत्येकाने निसर्गाच्या समतोलासाठी पर्यावरण संतुलनासाठी योगदान देण्याची गरज आहे. कोरोनाच्या या काळात अनेक आव्हानावर मात करुन आपण प्राणवायुचे महत्व समजून घेतले.
कोरोनाचे आव्हान अजूनही संपलेले नाही हे लक्षात घेवून सर्व नागरिकांनी आरोग्य सुरक्षिततेसाठी कटिबध्द होवून वृक्षारोपणासारख्या मूलभूत बाबीपासून सुरवात करावी. आपले पर्यावरण ठीक राहिले तर आपण ठीक राहु आणि ते नीट ठेवण्याची जबाबदारी ही आपली सर्वांची आहे. पर्यावरण रक्षणातील आपला वाटा म्हणुन जलंब नाका परिसर तसेच आजूबाजूच्या परिसरातील लहान मुला-मुलींनी ४०० झाड लावली आहेत. यावेळी यावेळी पूर्वा शर्मा, वेदश्री कुलकर्णी, वंशिका शर्मा,संस्कृती कुयरे,अनुष्का राजपूत,संस्कार कुयरे, पूजा शिंगटे,सिद्धेश कुलकर्णी, श्रीपाद कुलकर्णी, अथर्व आमले, समर्थ देशपांडे, भावेश जोशी यांनी योगदान दिले. तसेच आंशिका शर्मा, शिवानी कुलकर्णी, विहान कस्तुरे, खुशी शर्मा या लहानग्यांनी सुध्दा योगदान दिले. यावेळी या उपक्रमाला जितेंद्र कुयरे, श्रीकांत (पिंटू) टाले,अनिल भगत,आनंद कस्तुरे, विनय वरणगावकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले. ही रोप लावल्यानंतर रोपाला जगवण्याचे मोलाचे योगदान हे मॉर्निंगला जाणाऱ्या येणाऱ्यांचे राहणार आहे. तसेच या झाडांना पाणी देण्याची जबाबदारी स्थानिकांनी व या परिसरात राहणाऱ्यांनी नागरिक व दुकानदारांना देखील घ्यावी असे आवाहन केले होते. व तात्काळ त्यांनी या उपक्रमास पाठिंबा दर्शवत झाडांची जगवण्याची सुद्धा जबाबदारी स्वीकारली आहे.