मुंबई : प्रसिद्ध सिनेदिग्दर्शक, लेखक निशिकांत कामत याचं आज दीर्घ आजाराने उपचारादरम्यान निधन झाले. अत्यंत दु:ख झाल. नाटक, अभिनय आणि दिग्दर्शक क्षेत्रात त्यांनी आपल्या कामाचा अमिट ठसा उमटविला होता. त्यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘डोंबिवली फास्ट’ या मराठी चित्रपटाला सर्वोत्कृष्ट मराठी सिनेमाचा पुरस्कार देखील मिळाला आहे. मराठी सोबतच हिंदी चित्रपट सृष्टीतही त्यांनी आपला दबदबा निर्माण केला होता.निशिकांत कामत हे बॉलिवूडमधल्या नावाजलेल्या दिग्दर्शकांपैकी एक आहेत. यात अजय देवगणचा ‘दृश्यम’, इरफान खानचा ‘मदारी’, जॉन अब्राहमचा ‘फोर्स’ आणि ‘रॉकी हँडसम’ या सिनेमांचा समावेश आहे. हिंदी चित्रपटसृष्टीतील दृश्यम हा चित्रपट निशिकांत कामत यांच्या आयुष्यातील महत्त्वाचा पैलू ठरलाय. या चित्रपटामुळे त्याचं खूप कौतुक करण्यात आलं. अजय देवगन, तब्बू यांसारख्या मोठ्या कलाकारांसह केलेला या चित्रपटाने अनेक पुरस्कार पटाकवलंय.
त्यांच्या निधनाने एक उत्कृष्ट मराठी सिनेदिग्दर्शक कायमचा काळाच्या पडद्याआड गेला असून चित्रपट सृष्टीचे कधीही न भरून निघणारे नुकसान झाले आहे. निशिकांत कामत यांना निर्भिड स्वराज्य कडून भावपूर्ण श्रद्धांजली !
previous post