खामगांव : आजच्या आधुनिक युगामध्ये प्रत्येक घडामोडी लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही निर्भिड स्वराज्य वृत्तपत्रानंतर निर्भिड स्वराज्य वेबसाईट घेऊन आलो आहोत.दिनांक २४ फेब्रुवारी २०२० रोजी निर्भिड स्वराज्य वेबसाईट चे अनावरण भारिप बहुजन महासंघाचे प्रदेशाध्यक्ष तसेच वंचित बहुजन आघाडी संसदीय समिती चे सदस्य अशोक सोनोने यांच्या हस्ते खामगांव येथे त्यांच्या निवासस्थानी करण्यात आले. या वेबसाईटच्या अनावरण वेळी अशोक सोनोने यांनी वंचित बहुजन आघाडी व श्रद्धेय अँड बाळासाहेब आंबेडकर व वंचीत बहुजन आघाडी ,भारिपच्या वतीने निर्भिड स्वराज्य च्या संपूर्ण टीम ला शुभेच्छा दिल्या व मी नेहमी तुमच्या सोबत आहे असे आश्वासन दिले. यावेळी निर्भिड स्वराज्य टीम चे अमोल गावंडे, कुणाल देशपांडे, नितीन सुर्वे, शिवाजी भोसले, कृष्णा जवंजाळ, साक्षी गोळे पाटील, तेजल पाटील उपस्थित होते.वेबसाईट सुरु करायच्या आधी निर्भिड स्वराज्यच्या टीम ने साप्ताहिक निर्भिड स्वराज्य वृत्तपत्राची सुरुवात केली आहे व या निर्भिड स्वराज्य साप्ताहिक वृत्तपत्राचा विमोचन कार्यक्रम १२ जानेवारी २०२० रोजी राजमाता जिजाऊ जन्मदिनी मातृतीर्थ सिंदखेड राजा येथे जिजाऊ जन्मोत्सव सोहळ्यात शिवधर्म पीठावर युगपुरुष शि. पुरुषोत्तम खेडेकर साहेब, छत्रपती यांचे वंशज छत्रपती संभाजीराजे भोसले तसेच इतर मान्यवरांच्या यांच्या हस्ते पार पडला होता. पुढे याच माध्यमातून लेख, बातम्या, ब्रेकींग, अपडेट, विश्लेषण देऊन अनेक नवीन लोकांच्या मनाशी जुळून संवाद करण्यासाठी निर्भिड स्वराज्य ने वेबसाईट ची सुरुवात केली आहे.आम्ही निर्भिड स्वराज्यच्या वेबसाइट वरुन नुसते ब्रेकिंग न्युज़ न देता जे काही घडते त्याचे सखोल विश्लेषण सुध्दा देतो व सत्य समोर आणायचा पुर्ण प्रयत्न सुध्दा करतो. सामाजिक, राजकीय घडामोडी, सरकारी योजनांची अंमलबजावणी, महिलांचे प्रश्न, अनुसुचित जाती-जमातींवर होणारे अन्याय, बेरोजगारी, भ्रष्टाचार, इतिहासाची मोडतोड, आर्थिकसाक्षरता,शिक्षण,शेतकरी,कष्टकरी,विद्यार्थी, जनसामान्य लोकांना न्याय मिळावा यासाठी लेखणीतुन नव्हे तर प्रत्यक्षात सुद्धा न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करतो. याशिवाय निर्भिड स्वराज्य वेबसाईट मधे क्रीडा, संस्कृती, परिसर,आरोग्य, मनोरंजन इ. सर्व प्रकाशित करतो. यासह अजुन भरपूर गोष्टीचा यामधे समावेश सुद्धा आम्ही केला आहे. अश्याच नवनवीन अपडेट व चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी निर्भिड स्वराज्य वेबसाईटला व फेसबुक पेज ला भेट देऊन लाईक, कमेंट व शेअर करा.जाऊन घ्या अपडेट आणि राहा अपडेट हि विनंती.Attachments area