November 20, 2025
Featured

निर्भयाच्या दोषींना अखेर दिली फाशी ; ७ वर्षांनी मिळाला न्याय

दिल्ली : संपूर्ण देशाला हादरवून सोडणाऱ्या चर्चित निर्भया सामूहिक बलात्कार आणि खुनाच्या प्रकरणातील चार दोषी मुकेश सिंह, पवन गुप्ता, विनय शर्मा आणि विनयकुमार सिंह यांना आज पहाटे साडेपाच वाजता तिहार तुरुंगात फासावर लटकवण्यात आले. एकाच वेळी चार आरोपींना फाशी देण्याची ही पहिलीच वेळ आहे. निर्भया प्रकरणी चारही दोषींना आज तिहार तुरुंगात फाशी दिली गेली. तिहार तुरुंगात एकाचवेळी चार जणांना फासावर चढविण्याची ही पहिलीच घटना आहे. तिहारच्या तुरुंगाच्या क्रमांक तीनमध्ये आज ही फाशी दिली गेली. फाशीसाठी बिहारच्या बक्सरमधून दोर मागवण्यात आले होते.
दोषींना फाशी देण्याचा ५ मार्च रोजी चौथे ‘डेथ ‌वॉरंट’ काढताना न्यायालयाने २० मार्च रोजी पहाटे साडेपाच वाजता फाशीची वेळ निश्चित केली होती. मात्र चालू वर्षात २२ जानेवारी, १ फेब्रुवारी आणि ३ मार्च रोजी दोषींना फासावर चढविण्यासाठी काढण्यात आलेले ‘डेथ वॉरंट’ कायद्यातील पळवाटांमुळे निष्प्रभ ठरले होते.

पोस्टमार्टमचीही झाली होती तयारी

चौघांच्या मृतदेहाचे पोस्टमार्ट डीडीयू हॉस्पिटलमध्ये करण्यात येणार आहे. मात्र कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास दुसऱ्या हॉस्पिटलमध्येही पोस्टमार्टम करता येईल. डॉक्टरांच्या एका टीमकडून पोस्टमार्टम केले जाईल. त्याचा व्हिडिओही रेकॉर्ड केला जाईल, अशी माहिती अधिकाऱ्याने दिली.

Related posts

Build Muscle By Making This Simple Tweak to Your Training Program

admin

What You May Have Missed at the Alley 33 Fashion Event

admin

जगाला कट, कॉपी आणि पेस्ट (‘Cut, Copy, Paste’) हे शब्द देणारे वैज्ञानिक लॅरी टेस्लर यांचं निधन

nirbhid swarajya
error: Content is protected !!