January 1, 2025
आरोग्य खामगाव जिल्हा बुलडाणा महाराष्ट्र राजकीय विदर्भ शिक्षण शेतकरी

निम्न ज्ञानगंगा प्रकल्पस्थळी 5 उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली…

शेतकर्‍यांना न्याय न मिळाल्यास जलसमाधी घेणार- श्याम अवथळे

खामगाव : तालुक्यातील मौजे निमकवळा येथील ड्रीम प्रोजेक्ट म्हणून ओळख असलेल्या निम्न ज्ञानगंगा प्रकल्प 2 बृहत लघुपाटबंधारे योजने अंतर्गत धरणाचे काम पूर्ण केले असले तरी प्रशासनाने प्रकल्पग्रस्त शेतकर्‍यांना आजपर्यंत मोबदला मिळाला नाही. त्यामुळे 26 जानेवारी पासून शेतकर्‍यांनी प्रकल्प स्थळी आमरण उपोषण सुरु केले असून आज उपोषणाचा दहावा दिवस आहे. मात्र प्रशासनाने अद्याप दखल घेतली नाही. दरम्यान सुरेंद्रसिंग राठोड, प्रकाश धोटे, अनंता वाघमारे, चैतन्य वाफधाने, श्रीराम मुंडे या 5 उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली आहे. तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्याम अवथळे यांनी शुक्रवारी जलसमाधी घेण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती मिळाली आहे. शेतकर्‍यांच्या संपूर्ण मागण्या जोपर्यंत पूर्ण होत नाही आणि या प्रकल्पाची सखोल चौकशी होऊन लघु पाटबंधारे विभाग बुलढाणा येथील दोषी अधिकार्‍यांवर कार्यवाही करण्यात येत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असून अधिक तीव्र करण्यासोबतच जलसमाधी घेण्याचा इशारा श्याम अवथळे यांनी दिला आहे. सदर शेतकर्‍यांच्या आंदोलनाची प्रशासन दखल घेत नसल्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर आंदोलनस्थळी भेट देणार असून वेळ पडल्यास आंदोलनात सहभागी होतील अशी माहिती श्याम अवथळे यांनी दिली. या आंदोलनात काळेगाव,रोहणा, निमकवळा व दिवठाणा या गावातील महेंद्रसिंग राठोड, सुरेंद्र राठोड, रवींद्र राठोड, प्रल्हाद वाघमारे, प्रमोद निमकर्डे, रामेश्वर मुंडे, प्रकाश धोटे, वसंत अमलकार,परमेश्वर राठोड , श्रीकृष्ण देवकर, वामन मानकर, न्यानदेव मोरखडे, श्रीराम मुंडे, नारायण वाफधाने, शालिग्राम वाघमारे, ज्ञानेश्वर सातव यांचे उपोषण सुरू आहे. तर उपोषणकर्त्यांचा तपासणी आज वैद्यकीय अधिकारी डॉ.संगिता इंगळे रोहणा व डॉ. दिप्ती पिलवतकर यांनी तपासणी केली असता उपरोक्त 5 जणांची प्रकृती खालावल्याचे दिसून आल्याने त्यांना पुढील उपचारार्थ रूग्णालयात हलविण्याचा सल्ला त्यांनी दिला.

Related posts

जिल्ह्यात वाजणार ग्रामपंचायत निवडणूक चे बिगुल…

nirbhid swarajya

जिल्ह्यात आज प्राप्त 28 कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’; तर 7 पॉझिटिव्ह

nirbhid swarajya

चोरट्यांनी चोरलेल्या गाड्या सापडल्या विहिरीत…

nirbhid swarajya
error: Content is protected !!