November 20, 2025
आरोग्य खामगाव जिल्हा बातम्या बुलडाणा महाराष्ट्र राजकीय विदर्भ शिक्षण शेतकरी

निम्न ज्ञानगंगा प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे उपोषण सलग १३ व्या दिवशीही सुरूच

खामगाव : तालुक्यातील निमकवळा येथील ड्रीम प्रोजेक्ट म्हणून ओळख असलेल्या निन्म ज्ञानगंगा प्रलक्प २ बृहत लघुपाटबंधारे योजने अंतर्गत धरणाचे काम पुर्ण करण्यात आले आहे. या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी मोबदला मिळावा या मागणीसाठी २६ जानेवारीपासून प्रकल्पस्थळीच उपोषण सुरू केले आहे. दरम्यान या आमरण उपोषणाला पाठींबा देत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्याम अवथळे यांनी दि.३० जानेवारी पासून उपोषणाला पाठिंबा देत स्वतः उपोषण सुरू केले होते तरी तब्बल त्यांच्या उपोषणाला ८ दिवस झाले असून आज ६ जानेवारी रोजी इतर शेतकऱ्यांना सलग १३ व्या दिवशीही हे उपोषण सुरूच असून आंदोलनात सहभागी शेतकऱ्यांनंतर आता स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष श्याम अवथळे यांची पकृती सुध्दा खालावली आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे मात्र प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे. तालुक्यातील निमकवळा येथील निन्म ज्ञानगंगा प्रलक्प २ बृहत लघुपाटबंधारे योजने अंतर्गत धरणाचे काम पुर्ण करण्यात आले आहे. मात्र प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना आजपर्यंत मोबदला मिळालेला नाही. त्यामुळे २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनापासून शेतकऱ्यांनी प्रकल्पस्थळी आमरण उपोषण सुरू केले आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष शाम अवथळे यांनी सुध्दा या आंदोलनाला पाठींबा देवून उपोषणात सहभाग घेतला आहे. गेल्या १३ दिवसांपासून हे उपोषण सुरू असताना प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष केल्या गेले. त्यामुळे शेतकऱ्यांनी उपोषण स्थळी, भजन किर्तन, आमरण उपोषण करून दि.५ फेब्रुवारी रोजी तर संतप्त शेतकऱ्यांनी टोकाचे पाऊल उचलत ज्ञानगंगा प्रकल्पामध्ये उड्या घेवून जलसमाधीचा प्रयत्न केला होता.या दिवसांच्या काळात अनेक शेतकऱ्यांची प्रकृती खालावल्यामुळे त्या शेतकऱ्यांना उपचारार्थ रूग्णालयात भरती करण्यात आले आहे. असे असतानाही कडाक्याच्या थंडीतही प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी प्रकल्पस्थळी उपोषण सुरू ठेवले आहे. दरम्यान आज ६ फेब्रुवारी रोजी सलग १३ दिवशी हे उपोषण सुरूच असून आज आरोग्य विभागाच्या टिमने उपोषणस्थळी जावून उपोषण कर्त्यांची तपासणी केली. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्याम अवथळे यांची प्रकृती खालावली असून त्यांचे वज ३ किलो घटले असल्याचे निदर्शनास आले असून प्रचंड त्यांना अशक्त पणा आला आहे, त्यांच बरोबर त्यांना दवाखान्यात जाण्याचा सल्ला डॉक्टर यांनी दिला आहे. दरम्यान जोपर्यंत शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत आपण उपोषण सुरूच ठेवणार असून यापुढे उग्र स्वरूपाचे आंदोलन करणार असल्याचा इशारा यावेळी श्याम अवथळे यांनी दिला आहे. तब्बल १३ दिवसांपासून हे उपोषण सुरू असताना मात्र प्रशासनाकडू याकडे दुर्लक्ष केल्या जात असल्याने शेतकऱ्यांमध्ये रोष व्यक्त केला जात आहे.

Related posts

कोरोना योद्धाचा पारिवारिक सत्कार

nirbhid swarajya

जिल्हयात आज प्राप्त ०८ कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’

nirbhid swarajya

एस टी च्या स्मार्ट कार्ड साठी मिळाली मुदतवाढ;

nirbhid swarajya
error: Content is protected !!