जळगाव जा :जळगाव जामोद तालुक्यातील निमकराळ येथे वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली यामध्ये वीज पडून दोन जणांचा मृत्यू तर एक महिला गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे.मिळालेल्या माहीती नुसार आज २० आँगष्ट रोजी दुपारच्या वेळी जळगाव जामोद तालुक्यातील निमकराळ आडोळ,मांडवा,तिवडी,गौलखेड, दादुलगाव या परिसरात अचानक ढगाचा गडगडाट आणि वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाला सुरवात झाली.मेघगर्जनेसह झालेल्या या पावसात मोठ्या प्रमाणात विजा चमकत होत्या. वादळी वारा सुरू होता.सध्या शेतातील कामे सुरू असल्याने निमकराळ येथील अमोल रघुनाथ पिसे वय २२ वर्ष,मधूकर तुळशीराम उगले वय ५६ वर्ष आणि त्यांच्या पत्नी यमुना मधूकर उगले वय 48 हे तीघेही शेताता काम करत होते.विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरवात झाली.पावसापासून बचाव व्हावा म्हणून तीघांनीही शेतातील झाडाचा आसरा घेतला.मात्र आसरा घेतलेल्या त्या झाडावर विज पडली आणि झाडाखाली असलेल्या अमोल पिसे आणि मधूकर उगले या दोघांचा जागेवरच मृत्यू झाला तर यमुना उगले ह्या गंभीर जखमी झाल्या. वृत्त लिहेपर्यंत मृत झालेल्या दोघांनाही शवविच्छेदन करण्याकरिता जळगाव जामोद दवाखान्यामध्ये नेण्यात आले होते.