खामगांव-नांदुरा रोड वरील घटना
खामगांव : गेल्या काही महिन्यापासून रोड चे कामे सुरु आहेत. अशातच नांदुरा रोडवरिल सुटाळा खुर्द फाट्याजवळ माळी नगर कड़े जाणाऱ्या रस्त्याचे डांबरीकरणाचे काम आज संध्याकाळच्या सुमारास सुरु असताना रोडवरील सिमेंटच्या नालीचे बांधकाम कच्चे असल्यामुळे टिप्पर क्र MH 30 BD 3163 चे चाक हे नालीत फसले होते.त्यामुळे त्याचे काही वेळ वाहनांची रांग लागली होती.ट्रक चे चाक पोकलँड च्या सहाय्याने बाहेर काढण्यात आले. या नालीचे बांधकाम काही दिवसांपूर्वी झाले होते. आज माळी नगर कडे जाणाऱ्या रोड च्या डांबरिकरणाचे काम सुरु असताना गिट्टी व डांबर ने भरलेला तेथे मटेरियल टाकण्यासाठी आला होता. त्यातील माल खाली करत असताना तो ट्रक नवीन तयार झालेल्या नालीच्या वर थांबला, नालीवरचे बांधकाम कच्चे असल्याने नालीचा मलबा तुटून ट्रक त्यामधे फसला होता. यावरून शहरातील नालीचे बांधकाम किती निकृष्ट दर्जाचे असेल हे हया वरून लक्षात येते. आता तरी वरिष्ठ अधिकाऱ्यानी या कडे बारकाई ने लक्ष द्यावे अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.