नांदुरा : माळेगांव गोंड येथील स्थानिक नानाजी देशमुख कृषीसंजिवनी प्रकल्प योजनेमध्ये समूह सहाय्यक सुशील डोंगरदिवे यांनी वर्षभरामध्ये ऑनलाईन अर्ज झालेल्या अर्जांवर हलगर्जीपणा करत असून त्रुटी असलेल्या अर्जदारांना कुठलीही माहिती देत नाही. यामुळे या योजनेचा फायदा हा मोजक्याच लोकांना होत आहे. व गरजू लोक यापासून वंचित राहले आहेत.सदर अधिकारी यांनी गावामधे BBF योजनेची माहिती न देता त्यांच्या मर्जीतील मोजक्याच लोकांना माहिती देऊन इतर ट्रॅक्टर चे अर्ज लॉटरी पद्धतीने आपोआप बाद करण्यात आले. संबधित अधिकारी गावात न येता शहरात बसून फोनवरच गावातील लोकांना माहिती देतात. यामुळे इतर शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होत आहे. जे मोजके शेतकरी संबधित सहाय्यकच्या संपर्कात आहेत त्यांनाच प्रत्येक बाबतीत मार्गदर्शन होते आणि इतर गरजू शेतकरी योजनेपासून वंचित राहतात. यामुळे संबंधित साहाय्यक यांच्यावर योग्य ती कार्यवाही करावी जेणेकरून यापुढे शेतकर्यांचे होणारे नुकसान टळले अशी मागणी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष अक्षय रवींद्र हेलगे यांनी उपविभागीय कृषी अधिकारी खामगाव यांच्याकडे केली आहे. याची प्रत पालकमंत्री बुलढाणा जिल्हा जिल्हाधिकारी बुलढाणा जिल्हा ,ना दे कृ स प्रकल्प संचालक मुंबई ह्यांना देण्यात आली आहे.