January 4, 2025
खामगाव गुन्हेगारी जळगांव जामोद जिल्हा बुलडाणा

नांदेड़ येथील कंत्राटदाराविरूध्द फसवणुकीचा गुन्हा

खामगाव : पाणीपुरवठा योजनेचे कंत्राट मिळविण्यासाठी खोटे व बनावट अनुभव प्रमाणपत्र दाखवून शासनाची फसवणूक करणाऱ्या एका कंत्राटदाराविरूध्द शहर पोस्टे मधे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जिगाव उपसिंचन विभागाअंतर्गत जिगाव प्रकल्पातील पुर्नवसन करण्यात आलेल्या १५ गावांच्या गावठाणामध्ये २९ कोटी ४२ लाख ५८ हजार रूपये खर्चाच्या पिण्याचे पाणी पुरवठा योजनेच्या कामाची जाहिरात कार्यालयाकडून ८ मार्च २०२० रोजी प्रकाशित करण्यात आली होती. सदर निविदा प्रक्रियेत नांदेड येथील मे,आर.जी. कंस्ट्रक्शनचे रावसाहेब गोविंदराव सानप यांनी कंत्राट मिळविण्यासाठी बनावट अनुभव प्रमाणपत्र सादर केले होते. लॉकडाऊन असल्यामुळे कार्यकारी अभियंता हजारे यांना सदर ऑनलाईन निविदेचा लीफाफा २० मार्च २०२० रोजी प्राप्त झाला असता त्यामध्ये उपरोक्त कंत्राटदाराने बनावट अनुभव प्रमाणपत्र सादर करून शासनाची फसवणुक केल्याचे आढळून आले. त्यामुळे सदर कंत्राटदाराची अनामत रक्कम १४ लाख ७१ हजार ३०० रूपये शासनाकडून जप्त करण्यात आले आहे. कार्यकारी अभियंता यांनी शहर पोलिसांनी नांदेड़ येथील मे.आर.जी. कंस्ट्रक्शन रावसाहेब गोविंदराव सानप यांच्याविरूध्द कलम ४२०, ४६८, ४७१, ६६अ, ६६ ड नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक सुनिल अंबुलकर हे करीत आहेत.

Related posts

कुनी बी मेंढ्या इकत घेईन्यात;जेवणाचे वांधे

nirbhid swarajya

जिल्ह्यात आज प्राप्त 41 कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’; तर 05 पॉझिटिव्ह

nirbhid swarajya

ट्रक भिंतीवर धडकून भिंतिच्या मलब्याखाली दबून१ जण ठार; २ जण जखमी

nirbhid swarajya
error: Content is protected !!