November 20, 2025
नांदुरा

नांदुऱ्यात ३ दिवस जनता कर्फ्यु

नांदुरा : शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून, शनिवार, २७ जून रोजी दोन जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. कोरोनाला रोखण्यासाठी नागरिक, व्यापारी यांनी एकमताने निर्णय घेत सोमवार ते बुधवार, असे तीन दिवस जनता कर्फ्यूची घोषणा करण्यात आली आहे. शहरात शनिवार, २७ जून रोजी शिवाजी नगर परिसरात एक व घासलेट पूरा येथील एक असे दोन पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. त्यांच्या संपर्कातील आठ जणांना क्वारंटीन करण्यात आले आहे. शहरात दिवसेंदिवस कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत असून, एका कोरोना संदिग्ध रुग्णाचा मृत्यूही झाला आहे. शहरातील कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सर्व नगरसेवक, व्यापारी, यांनी एकमताने निर्णय घेऊन २९ जून ते १ जुलै सोमवार, मंगळवार, बुधवार असे तीन दिवस जनता कर्फ्यु पाळणार असल्याचे सर्वांनी एकमताने ठरविले आहे. याबाबतची माहीती तहसीलदार राहुल तायडे यांनी बैठकीत दिली आहे. या बैठकीत तालुका आरोग्य अधिकारी खंडारे, वैद्यकिय अधिकारी चेतन बढे यांनी नांदुरा नगर पालीका अध्यक्ष रजनी अनिल जवरे, उपाध्यक्ष लालाभाऊ इंगळे, आरोग्य अधिकारी निरज नाफडे यांच्यासह आदींची उपस्थिती होती.

Related posts

संभाजी ब्रिगेड नांदुरा तर्फे रक्तदान शिबिर

nirbhid swarajya

कोरोना संशयित महिलेचा मृत्यू

nirbhid swarajya

रागाच्या भरात दारुड्या पतीने केली पत्नीची हत्या

nirbhid swarajya
error: Content is protected !!